Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
महाराष्ट्रात लॉकडाउनच्या आदेशाचे उल्लंघन,१४१0 जणांना अटक तर ६५ लाखाहून अधिक दंड वसूल...

दि . 08/04/2020

मालेगाव : कोरोना व्हायरसने देशभरात थैमान घातले आहे.त्यामुळे सरकारने लॉकडाउनचे आदेश देण्यात आले आहे. कोरोनाबाधित रुग्णांवर दिवसरात्र डॉक्टर्स, नर्स आणि वैद्यकिय कर्मचाऱ्यांकडून उपचार केले जात आहे. तसेच या काळात फक्त अत्यावश्यक सेवा सुविधा नागरिकांना पुरवण्यात येणार आहे.

 मात्र नागरिकांना घराबाहेर विनाकारण फिरण्यास सक्त मनाई आहे. तरीही नागरिक रस्त्यावर फिरताना दिसून येत असल्याने पोलिसांकडून कारवाई केली जात आहे. याच पार्श्वभुमीवर महाराष्ट्रात लॉकडाऊनची आदेशाचे उल्लंघन केलेल्या १४१४ जणांच्या विरोधात कारवाई करत त्यांना अटक करण्यात आले. आहे. तर ६५ लाखांहून अधिक रुपयांचा दंड वसूल करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ट्रीट करत असे म्हटले आहे की, लॉकडाउनच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी १ हजाराहन अधिक जणांना अटक करण्यात आली आहे. तसेच ७५७० वाहने जप्त करण्यात आली असून ६५,४३,६२४ रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. दुसऱ्या बाजूला ४९,७०८ जणांना कोरोना व्हायरसचे संक्रमण झाल्याने कोरंटाइन करण्यात आले आहे. कलम १८८ अंतर्गत २३,१२६ गुन्हे आणि ४,४७,०५० स्थलांतरित कामगारांना ४५३२ पम ध्ये राहण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे.


ताज्या बातम्या