Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
स्वस्त धान्य दुकानावरही सोशल डिस्टनसिंगला महत्व

दि . 06/04/2020


देवळा प्रतिनिधी राकेश आहेर
दि .६ / ४ / २०२०
कोरोना विषानूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ठिकठिकानी विविध उपाययोजना करण्यात येत आहे  त्याचाच प्रत्येय  म्हणुन 
  देवळा तालुक्यातील दहिवड व रामनगर  येथील स्वस्त धान्य दुकानदार मधुकर शिंदे , व गोकुळ पानसरे यांच्या कडून शोषल डिस्टनसिंग चे नियम पाळत रेशन वाटप करण्यात आले .कोरोना या रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्व भारतातील नागरिक एकवटली आहेत . यासाठी लोकांची उपासमार होऊ नये म्हणून शासनाने रेशन दुकानात एप्रिल महिन्याचे धान्य उपलब्ध करण्यात आले असून त्याचे वाटप करण्यात येत आहे . त्यासाठी गावातील नागरिकांनी गर्दी करु नये म्हणून रेशन दुकानाच्या आवारातील तीन- तीन फुटाच्या अंतरावर चौकोन तयार केले असून त्या चौकोनात प्रत्येक व्यक्तीस उभे राहुन मास्क किंवा तोडांला रुमाल बांधुनच रेषनचे  वाटप करण्यात येत होते . 
नागरिकांना रेशन घेताना उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून दहिवड गावातील इच्छामणी साऊंड सिस्टिम चे संचालक गंगाधर खैरनार यांनी या नागरिकांना मोफत मंडप सुविधा उपलब्ध करून दिली . त्यामुळे त्यांचे परिसरातून कौतुक करण्यात आले .यावेळी सरपंच आदिनाथ ठाकूर ,उपसरपंच मनीष ब्राह्मणकार , तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष गणेश देवरे ,ग्रामविकास अधिकारी दत्तात्रेय सूर्यवंशी , प्रहार शेतकरी संघटना तालुका अध्यक्ष संजय देवरे , गौतम महिरे ,कोतवाल बापू अहिरे . यावेळी गावातील कर्तव्यदक्ष ग्रामस्थांचे सहकार्य लाभले .


ताज्या बातम्या