Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
लॉकडाऊन तोडत असाल तर सावधान , मालेगाव पोलीस ५३ CCTV च्या आधारे ठेऊन आहेत नजर..

दि . 06/04/2020

मालेगावात सीसीटीव्हीची नजर , शहरातील विविध भागात ५३ कॅमेरे 

मालेगाव (प्रतिनिधी) :- करोनाचा प्रादुर्भाव  रोखण्यासाठी संपूर्ण देशात लॉकडाऊन घोषित करण्यात आले असून त्याच्या अंमलबजावणीसाठी आता मालेगाव शहरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आहे. संपूर्ण शहरात जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार कलम १४४ नुसार संचारबंदी लागू करण्यात आली असून संचारबंदीचे उल्लंघन करणाऱ्या नागरिकांवर मालेगाव पोलिसांकडून कठोर कारवाई केली जात आहे. 

करोनाचा प्रादुर्भाव  रोखण्यासाठी संपूर्ण देशात लॉकडाऊन घोषित करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर मालेगाव शहरात देखील संचारबंदी लागू असून शहरात संचारबंदीचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कलम १८८ प्रमाणे एकूण ३८ तर मालेगाव शहर वगळून अन्यत्र असलेल्या पोलीस ठाणे हद्दीत एकूण ६० याप्रमाणे मालेगाव परिमंडळात एकूण ९८ संचारबंदी उल्लंघनाचे गुन्हे दाखल करण्यात आले. शहरात संचारबंदीचे उल्लंघन करणाऱ्यांवर आता सीसीटीव्ही कॅमेरांची नजर असणार आहे. शहरातील वेगवेगळ्या पोलिस ठाणे हद्दीतील मुख्य ठिकाणी एकूण ५३ कॅमेरे बसविण्यात आले आहे. यात शहर, छावणी, आयेशानगर, आझादनगर, रमजान पुरा, किल्ला आदी पोलीस ठाणे हद्दीत सदर कॅमेरे बसविण्यात आले असून तालुका पोलीस ठाणे हद्दीतील महा मार्गावरील धुळे नाशिक हद्दीत, तसेच चाळीसगाव रस्त्यावर देखील कॅमेरे बसविण्यात आले आहे. या साठी प्रत्येक हद्दीतील पोलीस ठाण्यात याचे कंट्रोल रूम तयार करण्यात आले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.


ताज्या बातम्या