Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
पोहण्यासाठी गेलेल्या अल्पवयीन मुलाने जीव गमावला ; दरेगाव शिवारातील गायदरा पाझर तलावातील घटना..

दि . 06/04/2020

मालेगाव :- करोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून संपूर्ण देशात संचारबंदी लागू केली आहे. कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या नागरिकांवर पोलिसांकडून गुन्हे देखील नोंदविले जात आहे. असे असताना देखील घराबाहेर पडून एका तलावात पोहण्यासाठी गेलेल्या एका अल्पवयीन मुलाला आपला जीव गमवावा लागल्याने परीसरात हळहळ व्यक्त होत आहे.

शहरातील जमहुर हायस्कूल परिसरातील अयुब नगर येथील चार अल्पवयीन मित्र हे दरेगाव शिवारातील गायदार पाझर तलावात पोहण्यासाठी गेले होते. यावेळी यातील सोहेल शेख (१२) रा. अयुब नगर यास पोहता येत नसल्याने त्याचा पाण्यात बुडून अंत झाला. स्थानिक नागरिकांनी ओरडण्याचा आवाज एकल्याने घटना स्थळी धाव घेतली, मात्र तो पर्यंत उशीर झाला होता. या घटनेची माहिती स्थानिक नागरिकांनी अग्निशामक विभागाला दिली असता अग्निशमन दलाच्या जवानांनी सदर मृतदेह बाहेर काढला.


ताज्या बातम्या