Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
होम क्वारंटाईन करण्यात आलेले आमदारांचे मदत साहित्य वाटपाचे छायाचित्र सोशल मिडीयावर व्हायरल ; आरोग्य अधिकाऱ्यांकडे कारवाईची मागणी

दि . 06/04/2020

मालेगाव :- येथील मालेगाव मध्यचे एमआयएमचे आमदार मौलाना मुफ्ती मोहंमद ईस्माइल यांना पर राज्य व विदेश दौरा या पार्श्र्वभूमीवर दि.१ एप्रिल पासून १४ एप्रिलपर्यंत होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. या प्रकरणानंतर शहरात एकच खळबळ उडाली होती. होम क्वारंटाईन होऊन ५ दिवस उलटत नाही तोच या आमदारांचा नवीन प्रताप सोशल मिडीयावर व्हायरल होताच आमदार पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे.
या आमदारांचे मदत साहित्य वाटपाचे छायाचित्र सोशल मिडीयावर व्हायरल झाल्यानंतर या नवीन वादाला तोंड फुटले आहे. यामुळे विरोधकांच्या हातात त्यांनी पुन्हा आयते कोलीत दिले असून काँग्रेसचे महानगर प्रवक्ते साबीर गोहर यांनी मनपा आरोग्य अधिकाऱ्यांना पत्र पाठवून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.


ताज्या बातम्या