Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
मातोश्री परिसरातील चहावाल्याला कोरोनाची लागण, परिसर सील..

दि . 06/04/2020

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे खासगी निवासस्थान 'मातोश्री'च्या मुख्य प्रवेशद्वारापासून जवळच असलेल्या चहावाल्याला करोनाची लागण ; परिसर सील ..

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे खासगी निवासस्थान 'मातोश्री'च्या मुख्य प्रवेशद्वारापासून जवळच असलेल्या चहावाल्याला करोनाची लागण. मुंबई महापालिकेच्या हवाल्याने पीटीआयने दिले वृत्त

वांद्रे पूर्व येथील कलानगर भागात ‘मातोश्री’ हे उद्धव ठाकरे यांचे खाजगी निवासस्थान आहे. ‘मातोश्री’पासून हाकेच्या अंतरावर चहाची टपरी आहे. तिथल्या चहा विक्रेत्याला प्रकृतीचा त्रास झाल्याने संपूर्ण भागात प्रवेश मनाई करण्यात आली आहे.
कलानगर हा ‘एच पूर्व’ विभागामध्ये मोडतो. 5 एप्रिलपर्यंत सापडलेल्या रुग्णांच्या आकड्यावरुन हा विभाग गंभीर प्रकारात मोडतो. इथे आतापर्यंत 25 कोरोनाग्रस्त आढळले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या खाजगी निवासस्थानासोबतच ‘वर्षा’ हे सरकारी निवासस्थानही गंभीर विभागामध्ये मोडते.


ताज्या बातम्या