Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
कान्हेरी नदी पात्रातील दारूच्या भट्ट्या पोलिसांनी केल्या उद्ध्वस्त,सटाणा पोलिसांची कार्यवाही

दि . 05/04/2020

पोलीस निरीक्षक नंदकुमार गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण पाटील पो.ना. भास्कर बस्ते, रवींद्र भामरे, पो.शि. धनंजय बैरागी ग्रामस्थांनी खंबीर भूमिका घेत गावातील गावठी दारूचे अड्डे उध्वस्त करीत दारू व त्यासाठी लागणारे तत्सम रसायने भांडे आदींची तोडफोड  करून राखरांगोळी केली. तसेच आदिवासी वस्तीत छापे टाकून विक्रीसाठी तयार असलेल्या गावठी दारूचे मोठमोठे ड्रम जमा करून ती दारू नष्ट करण्यात आली. यावेळी दारूबंदी कायद्याअंतर्गत बाबुराव शिवराम सोनवणे, भुरा अंकुश पवार, देविदास राणू पवार, यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले.
अनेक वेळा ग्रामपंचायतीत ठराव होऊन समज देऊनही दारूचा व्यवसाय बंद होत नव्हता तसेच पोलीस प्रशासनाकडून वेळोवेळी गुन्हे नोंदविले गेले होते मात्र त्यालाही न जुमानता आज पर्यंत सर्रासपणे दारू विक्रीचा व्यवसाय सुरूच होता. मात्र आजपासून दारूविक्री पूर्णत्व बंद केल्यामुळे गावकऱ्यांनी समाधान व्यक्त केले.
यावेळी पोलीस पाटील कांतीलाल सोनवणे ग्रामपंचायत सदस्य अनिल सोनवणे, काकाजी सोनवणे, सुरेश सोनवणे, संदीप सोनवणे, सिताराम अहिरे, गोकुळ सोनवणे, प्रवीण सोनवणे, एकनाथ सोनवणे, भाऊसाहेब अहिरे, संजय खैरनार, मितेश सोनवणे, अक्षय सोनवणे, अनिल सोनवणे, समाधान सोनवणे, जितेंद्र अहिरे, स्वप्नील देवरे,आदी उपस्थित होते.


ताज्या बातम्या