Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com




रमजानपुरा भागातील पॉवरलूम कारवाई प्रकरणातील पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवरच कारवाईचा बडगा..

दि . 05/04/2020

मालेगाव : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी देशभरात लोकडाऊन करण्यात आलंय. मोठं मोठ्या कंपन्यानी देशहितासाठी आपल्या इंडस्ट्रीला टाळ ठोकलंय. मात्र, मालेगावच्या पॉवर लूम चालक या संकट काळातही आपली मनमानी करत असून सरकारी आदेश पायदळी तुडवून सूत गिरणी राजरोसपणे सुरू ठेवत असल्याचं उघडकीस आलाय. विशेष म्हणजे केंद्र आणि राज्य सरकारच्या आदेशानुसार कारवाई करण्यासाठी गेलेल्या पोलीस उप निरीक्षक आणि इतर कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे.

मालेगाव हे कायमच संवेदनशीलशहर म्हणून ओळखले जाते. मात्र, देशावर आलेल्या आपत्तीच्या काळात तरी नियम कायदे पळाले जातील अशी अपेक्षा होती. मात्र, तीही धुळीला मिळाली आहे. विशेष म्हणजे केंद्र आणि राज्य सरकारच्या आदेशानुसार कारवाई करण्यासाठी गेलेल्या पोलीस उप निरीक्षक आणि इतर कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आलाय. रमजानपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पावरलूम सुरू असताना कर्तव्य बजावण्यासाठी गेलेल्या पोलीस उपनिरीक्षक सूरज आगे आणि त्यांच्या सहकार्यांशी सूत गिरिणीतील कामगारांनी हुज्जत घातली. त्यावेळी सौम्य बळाचा वापर करून पावरलूम  बंद करण्यास भाग पाडल्यानंतर वरीष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी कामगीरीवर असणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडेच खुलासा मागत करवाईचा बडगा उगारला आहे.


ताज्या बातम्या