Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
ग्रुपचे ऍडमीन किंवा टिकटोक स्टार आहात ? मग तुरुंगात जायला तयार व्हा !

दि . 05/04/2020

 ग्रुपचे ऍडमीन किंवा टिकटोक स्टार आहात ? मग तुरुंगात जायला तयार व्हा !

मालेगाव (योगेश पगारे) : करोना आणि लॉकडाऊन मुले सध्या जवळ जवळ सर्वच जन घरात आहेत, आणि मुबलक प्रमाणात फावला वेळसुद्धा प्रत्येकाकडे आहे, कोणी घरात बसून काम करत आहे, तर ज्याला कामच नाही ते सोशल मिडीयाचा आधार घेत वेळ घालवीत आहे, पण सावधान! काही अती-रिकामटेकडे ह्याच सोशल मिडीयाचा वापर करत टिकटोक व्हाटसअॅप वर अफवा, चुकीच्या बातम्या, समाजविघातक पोस्ट्स ग्रुप्स मध्ये शेअर करून तुम्हालाही अडचणीत आणू शकतात त्यात जरी तुमचा काही दोष नसला तरी जर तुम्ही ग्रुप चे ऍडमीन असल्याच्या नात्याने तुम्हालाही अटक होऊ शकते,

शासनाकडून वांरवांर विनंती सूचना केली जात असल्यावर सुद्धा काहींना या गोष्टींचे गांभीर्य आणि कायद्याचा धाक नसल्याचे निदर्शनात आले तर त्यांना आता ‘जेलची हवा खावी लागणार आहे’  त्यानुसार मालेगाव पोलिसांनी आत्तापर्यंत अफवा पसरविणे, सामाजिक तेढ निर्माण करणारे व्हिडीओ, पोस्ट टाकणे अश्या प्रकारच्या गुन्ह्यांत ८ जणांना ताब्यात घेऊन गुन्हा दाखल केला आहे.

सर्व नागरिकांनी यातून बोध घेऊन सध्याच्या फावल्या वेळचा सदुपयोग करून काहीतरी स्वत:ला समाजाला उपयुक्त होईल असे काही करणे गरजेचे आहे, आणि आपल्या ग्रुपच्या सेटिंग मध्ये बदल करून Post by Admins Only करून घ्यावी, किंवा ज्या ग्रुपमध्ये अश्या पोस्ट्स होत असतील त्यातून बाहेर पडावे, तसेच आपल्याला आलेल्या कुठल्याही मेसेज ची शहनिशा न करता तो पुढे फॉरवर्ड करू नये, कोरोना संदर्भात कुठल्याही प्रकारची माहिती किंवा बातमी हि शासनाखेरीज कुणीही प्रसिद्ध करू नये अन्यथा सदर व्यक्तीवरही गुन्हा दाखल होऊ शकतो   


ताज्या बातम्या