Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
मंदिरातील दानपेटी फोडून चोरी;पोलिसांनी पाठलाग करत पकडले चोरट्याला

दि . 05/04/2020

नाशिक : इंदिरानगर येथील महारुद्र कॉलनीमधील हनुमान मंदिरातील दानपेटी शनिवारी (दि. ४) पहाटे फोडून रोकड लंपास करणार्‍या एका चोरट्याला पोलिसांनी अटक केली. पोलीस आल्याची चाहूल लागताच दोन चोरटे फरार झाले. याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रवी साहेबराव खाडे (२४, रा, म्हाडा वसाहत, वडाळागाव, नाशिक) असे संशयिताचे नाव आहे.
इंदिरानगर पोलिसांचे रात्रीचे गस्तीपथक शनिवारी (दि. ४) रात्री गस्तीवर होते. पहाटे इंदिरानगर पोलिसात फिरोज शेख यांनी फोन करून त्यांच्या घराशेजारील हनुमान मंदिरात तीन संशयित असल्याची माहिती दिली. त्यानुसार पोलिसांचे गस्तीपथक घटनास्थळी आले. पोलीस आल्याची चाहूल लागताच तीन चोरटे पळू लागले. बीटमार्शल पोलीस पाठक व वळवी यांनी संशयित रवी खाडे यास पाठलाग करून अटक केली. त्याला पोलिसी खाक्या दाखवला असता त्याने दोन साथीदार संशयित मनोज शेंडगे व अक्षय खिल्लारे यांच्यासोबत महारुद्र हनुमान मंदिराचे कुलूप तोडून मंदिरातील दानपेटी फोडली असून त्यातील ५०० रुपये चोरल्याची कबुली दिली. मनोज शेंडगे व अक्षय खिल्लारे हे अंधाराचा फायदा फरार झाले. पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. पुढील तपास चार्वाक पोलीस चौकीचे पोलीस हवालदार राणे तपास करत आहेत.


ताज्या बातम्या