Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com




देवळा-मालेगांव रस्त्यावर खुंटेवाडी फाट्याजवळ अपघात;एकाचा जागीच मृत्यू

दि . 05/04/2020

देवळा:- येथील देवळा-मालेगाव रस्त्यावर खुंटेवाडी फाट्याजवळील वळणावर ट्रक व स्विफ्ट कार यांचा आज शनिवार (ता.४) रोजी अपघात होत त्यात एकाचा मृत्यू झाला. संचारबंदीत फारशी वर्दळ नसतांना हा अपघात झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, रेशनिंगचे धान्य सटाणा येथे पोहोचवून मनमाड कडे परत जाणारा ट्रक (एमएच१२ एफझेड ५८५८) व पिंपळगाव (वा.) कडून येणारी स्विफ्ट कार ( एमएच१५ जीएक्स ८४५६ ) यांचा खुंटेवाडी फाटा जवळील वळणावर कट लागल्याने अपघात झाला. यात ट्रक पलटी झाल्याने त्यातील ड्रायव्हर धनराज कारभारी गायकवाड रा.मनमाड (वय ५५) याचा मृत्यू झाला तर ट्रकमधील गोरख मधुकर थोरे रा. मनमाड व स्विफ्ट कार मधील प्रतिभां चेतन छाजेड रा. वडाळीभोई असे दोन जण जखमी झाले.
जखमींना तातडीने देवळा ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संचारबंदीत रस्ता मोकळा असल्याने वाहने जोरात असल्यामुळे हा अपघात झाला असावा असा अंदाज वर्तवला जात आहे. पोलीस निरीक्षक सुहास देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरु आहे. 


ताज्या बातम्या