Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
भाजपच्या वतीने ग्रामीण भागात मोलमजुरी करणाऱ्यांना जीवनावश्यक किटचे वाटप...

दि . 05/04/2020

मालेगाव : भारतीय जनता पक्षाच्या वतीने ग्रामीण भागात जीवनावश्यक किट वाटप करण्यात आले. 
जिल्हाध्यक्ष सुरेश नाना निकम यांच्या नेतृत्वाखाली शहरानंतर आज ग्रामीण भागाकडे आज पासून उपक्रमाची सुरुवात दाभाड़ी गावातून करण्यात आली.
ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात मोल मजूरी करणारे मजुर असून त्यांच्यावर उपासमारीची वेळ येवू नये ह्या भावनेतून ग्रामीण भागातील वाड्या वस्ती येथे हा उपक्रम घेण्यास सुरवात करण्यात आली.
जीवनावश्यक किट मध्ये तांदूळ, मूंग दाळ, उडित डाळ, तेल, साखर, चहापत्ती असा किमान एक महिन्याची शिधा असलेले किट वाटप करण्यात आले. संपूर्ण मालेगाव तालुका वाटप करण्याचा आमचा मानस असल्याचे जिल्हा अध्यक्ष यांनी आव्हान केले. लोकांनी घाबरून न जाता भारतीय जनता पक्षातर्फे शेवटच्या घटकापर्यंत शिधा पोहचविन्याचे काम आम्ही नक्कीच पोहचवु तसेच देशाचे पंतप्रधान नरेन्द्रजी मोदी यांच्या आव्हानाला सहकार्य करण्याची विनंती जिल्हा उपाध्यक्ष लकी गिल यांनी केली.
यावेळी जिल्हाध्यक्ष सुरेश नाना निकम, जेष्ठ नेते हरिप्रसाद गुप्ता, जिल्हा उपाध्यक्ष लकी गिल, तालुका अध्यक्ष नीलेश कचवे, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष देवा पाटिल, मुकेश झुनझुनवाला जिल्हा परिषद सदस्य संजय निकम, तालुका सरचिटणीस बापू यशवंत, प. स. सदस्य अरुण पाटिल, वैद्यकीय आघाडी तालुकाध्यक्ष डॉ उमेश निकम, हेमंत पूरकर, कमलेश निकम, पप्पू पाटिल व दाभाड़ी गावातील भाजप पदाधिकारी उपस्थित होते.


ताज्या बातम्या