Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
दिव्यांच राज कारण आणि संकटाची टिंगल-टवाळी

दि . 04/04/2020

“ अमेरिकेसारख्या बलाढ्य अतिविकसित देशात दिवसाला १५०० च्या वर मृत्यू होत आहेत, इटलीसारखा देश हाथ -पाय टेकवून शांत बसला, पाकिस्तानात तर अक्षरश : स्वतंत्र ‘कब्रिस्तान’ बनवून कबरी पण खोदुन टाकल्यात, त्यामानाने  ‘तब्लीगी’ अपवाद वगळता भारत संसर्गाच्या बाबतीत बराच ‘कंट्रोल’ ठेवून आहे.

‘करोना’ ज्यांना ह्या संकटाबद्दल माहिती आहे त्यांच्या मनात नुसत नाव घेतली तरी धडकी भरते, आणि दुसरीकडे अजाणतेपणा, अंधश्रद्धा, अज्ञान म्हणा किंवा ‘मोदी’ फोबिया म्हटले तरी वावगे ठरणार नाही यातली काही निष्काळजी, स्वार्थी, बेपर्वा मंडळी मोदींनी 9 तारखेच्या केलेल्या भावनिक आवाहनाला नावे ठेवत टीका करून आपण किती ‘हुशार’ आहोत ही दाखविण्याचा केविलवाणा प्रयत्न करीत आहेत. 
 संपूर्ण जग एका क्षणात ‘गार’ करण्याची क्षमता असलेल्या महाभयानक करोनारुपी विषाणूला दूर ठेवण्यासाठी हव्या तेवढ्या उपाय योजना करून, आर्थिक संकटाची तमा न बाळगता ‘नागरिक हित’ व प्राणांची पर्वा करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाऊन सारखा निर्णायक आणि फायदेशीर निर्णय घेतला, यातून होणारे आर्थिक नुकसान, जनतेची गैरसोय लक्षात ठेऊन इतर महत्वपूर्ण निर्णय सुद्धा घेतलेत आणि यशामुळे जगभरात ‘मोदींचे’ कौतुक होणे साहजिक आहेच, शिवाय इतरांचा ‘जळफळाट’ होणे तर ठरलेलेच होते. यात ज्या-ज्या ‘अति बुद्धिमान’ महाभागांनी आपल्या अकलेचे तारे तोडलेत त्यांनी एकदा तरी निदान स्वत:शी इमान ठेवत कबूल कराव, की मोदींनी आत्तापर्यंत जशी परिस्थिति हाताळली तशी त्यांचे ‘पूज्य’ नेत्यांनी हाताळली असती का? आणि जरी उसनी अक्कल घेऊन हाताळली असती तरी त्यांना एवढे जनसमर्थन मिळाले असते का ?पण ‘ बंदर क्या जाणे अद्रक का स्वाद’ ? वास्तविक मोदींच्या आवाहणाला जनता अतिरिक्त प्रतिसाद देते, याचा अर्थ असाच होतो की जरी नैराश्य येत असेल तरी मोदींच्या एका आवाहणाला प्रतिसाद देतांना लोकांचा उत्साह ओसंडून वाहतो हे मात्र खरे.. 
दुसरीकडे मोदींनी हाच उत्साह पुन्हा एकदा उफाळून यावा आणि गेल्या पंधरवड्यातली मनावर आलेली मरगळ झटकून टाकावी या उद्देशाने रात्री  9 वाजता 9 मिनिटे गॅलरीत , दारात दिवे, पणत्या, मेणबत्त्या, टॉर्च आदि लाऊन आपण सर्व एक आहोत आणि करोनारूपी अंध:कारातून मार्ग काढत प्रकाशाकडे वाटचाल करीत आहोत हे दाखविण्याची विनंती जनतेला केली. यावर राजकारण करण्याची काही एक गरज नव्हती, उगाच ‘पब्लिसिटी’ स्टंट करत   नुसते मोदीच नाहीत तर आम्ही पण आहोत , भले खोटे खोटे का होईना पण आम्हाला ही जनतेचा कळवळा आहे ही दर्शविण्याचा केविलवाणा प्रयत्न करतांना ही मंडळी दिसत आहेत. 
मदत करायला तर कोणी पुढे यायला तयार होत नाही, पण टीका करायला सर्वात पुढे असतात , ह्यांनी जर आपले 1 वर्षाचे वेतन किंवा निदान एक दिवसाची ‘ती’ कमाई देऊ करून असे वक्तव्य टीका केल्या असत्या तर लोकांनी मान्य पण केले असते. 
मागील काही दिवसांत तरी गरीब उपाशी मरणार वैगेरे वैगेरे  काही जन बरळत होते, वास्तविक नुसता ‘तो’ गरीबच  नाही, तर इतर जे लोक नोकरी करतात मग खासगी कंपन्यांत असो की कापडाच्या दुकानात प्रत्येकाला पोट असते, परिवार-गरजा अपेक्षा ईएमआय त्यानाही असतात, त्यानाही या काळात आर्थिक झळ  सोसाविच लागणार आहे, परंतु सकाळी कामवायचे आणि संध्याकाळी दारू-जुगार-विडी-तंबाकू यात असतील तेवढे उधळणाऱ्यांना गरीब म्हणणे ही ‘गरीबी’ शब्दाला’ लाजविणारेच ठरेल, उभ्या आयुष्यात जर 1 महिना स्वतचे पोत भरू न शकणाऱ्या तथाकथित गरीबाला सर्व आयते मिळविण्याची सवय लागेल, काही शासकीय अनुदानावर जगणारे तर २० -३० रुपयांचा मास्क सुद्धा शासनानेच वाटावा अशी मागणी करत होते, खरेच अश्या लोकांवर हसावे की रडावे की ओरडावे हेच कळत नाही..

अमेरिकेसारख्या बलाढ्य अतिविकसित देशात दिवसाला १५०० च्या वर मृत्यू होत आहेत, इटलीसारखा देश हाथ -पाय टेकवून शांत बसला, पाकिस्तानात तर अक्षरश : स्वतंत्र ‘कब्रिस्तान’ बनवून कबरी पण खोदुन टाकल्यात, त्यामानाने  ‘तब्लीगी’ अपवाद वगळता भारत संसर्गाच्या बाबतीत बराच ‘कंट्रोल’ ठेवून आहे. 
करोना अत्यंत भीतीदायक वास्तव असून जनतेने ‘योग्य’ ती काळजी घेणे गरजेचे आहे, भारतात पोलीस, आरोग्य विभाग आपला जीव पणाला लावून आपल्यासाठी लढत आहेत त्यात सहभाग नाही पण निदान साथ देणे तरी आपले कर्तव्य प्रत्येक नागरिकाने मानावे, आणि काही ‘अति काळजीवाहू’ लोकांनी नुसते बोम्बलण्यापेक्षा या प्रसंगी एक सुज्ञ नागरिक बनून टीका, टिंगल-टवाळी सोडूनया कार्यात आपले योगदान द्यावे व खरे जनसेवक असल्याचे जनतेला दाखवून दिले   तर पुढच्या वेळेस हि जनता तुम्हालाही डोक्यावर घेऊन नाचवेल. 

जय’ योगेश पगारे.


ताज्या बातम्या