Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
तुम्ही घरात रहा सुरक्षित रहा असे हातात पोष्टर घेऊन मालेगाव पोलीस करताय जनजागृती..

दि . 04/04/2020

मला 3 वर्षाची मुलगी आहे..,माझ्या घरात वृद्ध आई-वडील आहे...,माझी पत्नी माझ्या काळजात आहे तरी मी तुमच्या साठी घरा बाहेर आहे ..

तुम्ही घरात रहा सुरक्षित रहा असे हातात पोष्टर घेऊन मालेगाव पोलीस करताय जनजागृती..

कोरोनाचा प्रादुर्भाव हा गर्दीमुळे जास्त होतो त्यामुळे गर्दीवर नियंत्रण मिळविणे अत्यन्त गरजेचे आहे त्यासाठी अगोदर जमावबंदी नंतर संचारबंदी लागू करण्यात आली मात्र या दोन्ही बंदीला न जुमानता नागरिक मोठ्या संख्येने घरा बाहेर पडत आहे त्यांना घरात बसविण्यासाठी मालेगाव मधील पोलिसांनी आगळीवेगळी शक्कल लढवली असून गर्दी करू नका,घरात रहा, सुरक्षित रहा.. आम्हाला ही कुटुंब आहे..,मुलं आहे..,माझी 3 वर्षाची मुलगी आहे..,माझी पत्नी माझ्या काळजात आहे..

माझ्या घरी वृद्ध आई-वडील आहे  तरी देखील आम्ही तुमच्या सरंक्षणासाठी त्यांची परवा न करता घरा बाहेर आहे.हातात असे पोष्टर घेऊन मालेगावच्या  चौका-चौकात पोलीस उंभे असून  घरात रहा बाहेर पडू नका असे  ते नागरिकांना भावनिक आवाहन करीत   असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून त्याचा परिणाम देखील होत आहे


ताज्या बातम्या