Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली वाहनधारकांची बेशिस्त वाहतूक ; विनाकारण अवजड वाहने फिरविणा-यांवर कारवाईची मागणी..

दि . 03/04/2020

मालेगाव : सोयगाव (योगेश पगारे) :-  करोनाचा  प्रादुर्भाव रोखण्यासाठी एकीकडे संपूर्ण देशात संचारबंदी लागू केली असतांना मालेगाव शहरातील  काही भागात मात्र संचारबंदीचे सर्रास उल्लंघन होताना दिसून येत आहे. काही लोक ‘अत्यावश्यक सेवेचा’ देखावा करून मोठमोठी वाहने गल्लीबोळाचा - लहानमोठ्या रस्त्यांचा विचार न करता बेशिस्त, बेदरकारपणे हाकणे हे आता नित्याचेच झाले आहे. 

सोयगाव-टेहेरे फाटा चौकात पोलिसांतर्फे नाकाबंदी करण्यात आली असल्याने मोठमोठाली अवजड वाहने जाण्यासाठी तेथून मज्जाव करण्यात आला आहे. मात्र, अत्यावश्यक सेवांसाठी सोयगाव गावातला मध्यवर्ती रोड बायपास म्हणून वापरला जात होता. परंतु अत्यावश्यक सेवांचा नावाखाली इतर सर्व अवजड वाहने गावातून सर्रास भरधाव वेगाने धावतांना दिसत आहेत. गावातील मराठी शाळेजवळ स्वस्त धान्य दुकान असल्याने तेथे ‘राशन’ घेण्यासाठी नागरिक मोठ्या प्रमाणात रांगेत उभी असतात, सोशल डीस्टन्सिंग चे आधीच तीनतेरा वाजलेले असतांना अश्या प्रकारचा वाहने भरधाव वेगाने जात असल्याने नागरिक स्वतःचा जीव मुठीत धरून तेथे जवळजवळ उभी असल्याचे निदर्शनात येऊन गावातील युवकांनी एकत्र येऊन मराठी शाळेजवळून जाणारा रस्ता दगड व ओंडके बॅरीकेट  लाऊन बंद केला आहे.

करोनासारख्या अति भयानक विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी संपूर्ण देश एकवटला असतांना काही मूर्ख लोकांमुळे विषाणूचा फैलाव दिवसेंदिवस चिंताजनक परिस्थितीत वाढत चालला आहे. अशातच काही मूर्ख लोक विनाकारण फिरून ‘शायनिंग’ मारत आहेत, अशांना कठोर शासन करून विनाकारण अवजड वाहने फिरवीनाऱ्यावरही कारवाई करण्याची मागणी स्थानिक नागरिक करीत आहेत.


ताज्या बातम्या