Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
5 एप्रिलला 9 वाजता 9 मिनिटं वीज बंद करा ,पंतप्रधानांनी देशवासियांना केले आवाहन..

दि . 03/04/2020

पंतप्रधान मोदींच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे :

  • अंधःकारमय संकटाला पराभूत करण्यासाठी आपल्याला प्रकाशाचं तेज चारही दिशांना पसरवलं पाहिजे.
  • घंटी वाजवून, थाळ्या वाजवून लोकांनी दाखवून दिलं की, कोरोना व्हायरसविरोधात देश एक होऊन लढू शकतो.
  • आपण लॉकडाऊनदरम्यान घरात नक्कीच आहोत, मात्र आपल्यातला कुणीच एकटा नाहीय. प्रत्येकजण एकमेकांसोबत आहे.
  • कोरोनामुळं निर्माण झालेल्या संकटातून गरिबांना पुढे घेऊन जायचंय, प्रकाशाकडे त्यांना न्यायचंय.
  • येत्या रविवारी म्हणजेच 5 एप्रिलला कोरोनाच्या संकटाला आव्हान द्यायचंय. या 5 एप्रिलला महाशक्तीचं जागरण करायचंय. त्यासाठी रात्री 9 वाजता 9 मिनिट घरातल्या सर्व वीज बंद करा आणि घराच्या दारात किंवा बाल्कनीत उभं राहून मेणबत्ती किंवा मोबाईलची लाईट लावा. आपण एकजुटीनं लढतोय, हे त्यातून दिसेल.


ताज्या बातम्या