Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
CORONAVIRUS : धक्कादायक ! मालेगावचे आ. मौलाना मुफ्ती इस्माईल यांच्यासह १८ जण होम क्वारंटाइन.....

दि . 03/04/2020

मालेगाव शहरात खळबळ ; सहा जणांचा शोध सुरू
दक्षिण दिल्लीतील निजानुद्दीन भागात तबलिगी जमातच्या कार्यक्रमात सामील झालेल्या व्यक्तींना करोनाची लागण झाली असून यात 8 जणांना आपले प्राण गमवावे लागले आहे. या घटनेमुळे देशभरात खळबळ उडालेली असतांना या कार्यक्रमात मालेगाव शहरातील मुस्लिम बांधव देखील उपस्थित असल्याची माहिती समोर आली आहे. या कार्यक्रमामुळे निजामुद्दीन हे करोनाचे प्रसारकेंद्र होण्याची भीती व्यक्त होते आहे.
इंडोनेशिया, तांजेनिया, साऊथ आफ्रिका तसेच दिल्ली येथील तबलिगी जमातच्या कार्यक्रमात शहरातील एकूण 24 व्यक्ती सहभागी झाल्याची शासकीय माहिती समोर आली असून यातील 18 जणांना होम कोरोंटाइन करण्यात आले असून यातील अन्य सहा जणांचा शोध घेतला जात असल्याची माहिती उपायुक्त कापडणीस यांनी दिली. यातच विदेश व परराज्य दौरा करणारे मालेगावचे आमदार मुफ्ती यांना देखील कोरोंटाइन केल्याने शहरात खळबळ उडाली आहे. मात्र मुफ्ती यांचा विदेश दौर्‍याचा इतिहास बघता त्यांना कोरोंटाइन केले असल्याचा खुलासा येथील आरोग्य विभागाने केला आहे.
मालेगाव : दिल्ली येथील निजामुद्दीन परीसरात झालेल्या तबलिगी जमात या कार्यक्रमात संपूर्ण देश विदेशातून मुस्लिम बांधव सहभागी झाले होते. सदर बाब उघडकीस आल्यानंतर यातील काही व्यक्तींना करोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. यातच या कार्यक्रमात शहरातील 24 व्यक्ती दिल्लीसह अन्य देशांमध्ये जमातच्या कार्यक्रमात सहभागी झाल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. चिंतेची बाब म्हणजे या 24 व्यक्ती व्यतिरिक्त प्राप्त यादी नुसार मालेगाव मध्यचे एमआयएमचे आमदार मौलाना मुफ्ती इस्माईल यांचा विदेश दौर्‍याचा इतिहास बघता त्यांना देखील होम क्वारेंटाइन करण्यात आले असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.
दिल्ली कार्यक्रमाव्यतिरिक्त जिल्हाधिकार्‍यांकडून प्राप्त झालेल्या दोन नावांपैकी एक नाव मुफ्ती यांचे असल्यानेच त्यांना कोरोंटाइन करण्यात आले असून यातील अन्य एक जण अद्याप उत्तरप्रदेश येथील फैजाबाद येथे असल्याची माहिती महापालिका प्रशासनाने दिली आहे. आमदार मुफ्ती यांना कोरोंटाइन केले असले तरी या कालावधीत मुफ्ती हे शहरातील अनेक शासकीय आढावा बैठकीत उपस्थित असल्याने शासकीय अधिकार्‍यांसह त्यांच्या संपर्कात आलेल्या लोकांचे धाबे दणाणले आहे.


ताज्या बातम्या