Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
करोनाच्या संदर्भात टिकटॉकवर आक्षेपार्ह मॅसेज पसरून सोशल मीडियावर अफवा पसर्वाणाऱ्यांना अटक ; विशेष पोलीस पथकाची कारवाई...

दि . 02/04/2020

कोरोना व्हायरसचा संदर्भात टिक टॉक वर  घातक व्हिडियो बनवून शोशल मीडिया वर व्हायरल करणाऱ्या 4 जणांना  विशेष पोलीस पथकाने केली अटक...

मालेगावातील खळबळजनक प्रकार...

सात लाख पेक्षा जास्त लोकांनी पाहिला व्हिडीओ....

या प्रकरणी मालेगाव शहरात आझाद नगर व रमजाणपुरा पोलीस ठाण्यात 4 चार जणांच्या विरोधात दाखल झाला गुन्हा...

चारही आरोपींना 6 दिवसाची पोलीस कोठडी..

NRC आणि CAA चे पुरावे मागता आता करोना पाहिल असं दोघेही व्हिडीओत म्हटले आहे.करोनाचे एव्हडे भीषण संकट देशासमोर उभे असतांना या लोकांनी असे व्हिडीओ बनवणे योग्य नसते यामुळे समाजात वेगळा संदेश जातो त्यामुळे अशावेळी पोलिसी दांडू दाखवाचं लागतो.

 

टिक टॉक वर आक्षेपार्ह व्हिडीओ बवल्याची लक्षात येताच मालेगाव अपर पोलीस अधिक्षक यांनी स्थापन केलेल्या विशेष पथकाने त्यांना ताब्यात घेतले असून पुढील तपास करून आझाद नगर  आणि रमजान पुरा पोलीस निरीक्षक तपास करीत आहेत.

हि माहिती नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ. आरती शिह यांनी ट्विट केल्याने समोर आल्यानंतर प्रेस नोट काढण्यात आली आहे.
प्रशासकीय यंत्रणा एव्हड्या मोठ्या प्रमाणावर दिवसरात्र काम करून कोरोनाच्या प्रादुर्भाव वाढू नये यासाठी काम करीत असतांना अश्या लोकांमुळे केलेल्या उपाययोजनांवर पाणी फेरले जाते त्यामळे अश्या प्रवृत्तीच्या लोकांना या गुन्हयामुळे याद्दल घडेल आणि चांगला मॅसेज जाईल..


ताज्या बातम्या