Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
सातमाने येथे कायद्याचं उल्लंघन न करता या अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन ..

दि . 02/04/2020

मालेगाव (प्रतिनिधी) :- तालुक्यातील सातमाने येथे सालाबादप्रमाणे अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. मात्र संपूर्ण देशात करोणा विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संचारबंदी घोषित करण्यात आल्याने कायद्याचं उल्लंघन न करता या अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती माजी सरपंच दामू जाधव यांनी दिली आहे.

तालुक्यातील सातमाने येथे हनुमान मंदिर परीसरात
चैत्र शुक्ल ५ पंचमी रोजी अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात येते. या सप्ताहाची समाप्ती चैत्र शुक्ल १२ द्वादशी रोजी करण्यात येते. या सप्ताहात पंचक्रोशीतील भाविक सहभागी होत असतात. मात्र सध्या संपूर्ण जगात करोना विषानुने थैमान घातले असल्याने देशात संचारबंदी लागू केली आहे. या पार्श्वभूमीवर सातमाने येथील सप्ताहाच्या आयोजकांनी कार्यक्रमात बाधा पडू नये तसेच कायद्याचे उल्लंघन होऊ नये म्हणून या सप्ताहात भाविकांनी घरीच वाचन करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाला सातमाने गावासह पंचक्रोशीतील भाविकांनी साथ दिली असून घरोघरी या सप्ताह निमित्त अखंड हरिनाम सप्ताह साजरा केला जात असल्याची माहिती माजी सरपंच दामू जाधव तसेच रमेश जाधव, परशराम निकम, रमेश जाधव, पंकज जाधव यांनी दिली आहे.


ताज्या बातम्या