Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
मालेगाव महापालिकेच्या वैद्यकीय अधिकारी म्हणून डॉ. सपना  ठाकरे यांची नियुक्ती..

दि . 02/04/2020

मालेगाव - येथील महापालिकेच्या प्रभारी वैद्यकीय अधिकारी म्हणून डॉ.सायका अन्सारी यांच्याकडे अतिरिक्त कार्यभार देण्यात आला होता. आता पालिकेच्या वैद्यकीय अधिकारी म्हणून पूर्णवेळ डॉ. सपना  ठाकरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पालिका आयुक्त किशोर बोर्डे यांनी बुधवारी त्यांच्या नियुक्तीचे आदेश दिले आहेत. महापालिका हद्दीतील रुग्णांना वैद्यकीय सेवा मिळावी यासाठी स्वतंत्र पूर्णवेळ वैद्यकीय आरोग्य अधिकारी म्हणून ठाकरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. दरम्यान आ. मौलाना मुफ्ती यांना होम क्वारेंटाइन करण्यावरून माजी आ. आसिफ शेख यांनी आरोग्याधिकारी यांना पत्र लिहून कारण विचारले असतांना डॉ. सायका अन्सारी यांचा पदभार डॉ. ठाकरे यांच्याकडे अचानक का देण्यात आला? असा प्रश्न शेख यांनी उपस्थित केला आहे.


ताज्या बातम्या