Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
देवळा पोलिसांकडून वाहनधारकांवर कारवाई ; 22 हजार 600 रुपयांचा दंड वसूल

दि . 02/04/2020

देवळा:- लॉकडाऊन व संचारबंदी असतांना विनाकारण दुचाकी व चार चाकी वाहनातून फिरणाऱ्या नागरिकांवर देवळा पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला असून त्यांच्याकडू 22 हजार 600 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. अशी माहिती पोलीस उपविभागीय अधिकारी सदाशिव वाघमारे यांनी दिली.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशात संचारबंदी लागू असताना अशा काळात विनाकारण दुचाकी व चारचाकीवरून फिरणाऱ्यांवर शासनाने कडक कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. त्या अनुषंगाने देवळा तालुक्यात पोलिसांकडून त्यांच्यावर कारवाई करण्यात येत असून , आज दि 1 रोजी देवळा पाच कंदील परिसरात नाका बंदी घालण्यात आलेल्या ठिकाणी 56 व दि 31 रोजी 48 अशा 104 वाहन धारकांना समज देऊन त्यांच्याकडुन 22 हजार 600 रुपयांचा कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी दंड वसूल केला आहे.यामुळे वाहनधारकांनामध्ये खळबळ उडाली आहे . कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन लॉकडाऊन व संचारबंदी केली असून,लोकांनी घराबाहेर पडू नका असे आवाहन वारंवार करत असताना देखील काही लोक काम नसतांना घराबाहेर पडून कायदा हातात घेतांना दिसत आहेत.यामुळे शासनाने अशा लोकांवर कारवाईचे आदेश दिले आहेत.
 देवळा पोलिसांनी यामुळे कडक भूमिका घेतली असून,विनाकारण दुचाकी व चारचाकी वाहनातून फिरणाऱ्यांवर गुन्हे दाखल केले जात आहेत.यामुळे नागरिकांनी देखील याची काळजी घ्यावी ,व घराबाहेर पडू नका असे आवाहन उपविभागीय पोलीस अधिकारी सदाशिव वाघमारे यांनी केले आहे.देवळ्यात गेल्या दोन दिवसात 104 वाहनांवर कारवाई करण्यात येऊन त्यांच्याकडून जवळपास 22 हजार 600 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.या पथकात स्वतः पोलीस उपविभागीय अधिकारी सदाशिव वाघमारे,पोलिस निरीक्षक सुहास देशमुख,पोलीस उपनिरीक्षक संजय मातोंडकर आदिंसह त्यांचे सर्व कर्मचारी सहभागी झाले आहेत.नागरिकांनी याची दखल घेऊन विनाकारण घराबाहेर पडू नका व पोलिसांना कारवाईस भाग पाडू नका असे आवाहन करण्यात आले आहे.


ताज्या बातम्या