Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
मालेगाव सामान्य रुग्णालयातील ६ संशयितांचे अहवाल निगेटिव्ह

दि . 01/04/2020

५४ जण होम क्वारंटाइन

मालेगाव, ता. ३१ : शहरात मार्चअखेर एकही कोरोनाबाधित रुग्ण नसला, तरी दोन दिवसांत सामान्य रुग्णालयात दहा संशयित रुग्ण दाखल झाले. विदेशातून आलेल्या प्रवाशांची संख्या ८८ झाली आहे. यातील ३२ जणांची होम क्वारंटाइनची मुदत संपली आहे. दोघे परदेशात रवाना झाले असून, ५४ जण होम क्वारंटाइन आहेत. सामान्य रुग्णालयात दाखल असलेल्या सहा जणांच्या स्वबचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. हे सर्व सहा अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

दरम्यान, सामान्य रुग्णालयात सोमवारी (ता. ३१ ) दाखल झालेल्या नवीन चार संशयितांचे स्वॅब पाठविण्यात आले. यात शहरातील पुणे येथे तपासणीसाठी तिघा संशयितांचा समावेश आहे.

आयुक्त किशोर बोर्डे यांनी मंगळवारी महापालिकेत शहरातील खासगी डॉक्टरांची बैठक घेऊन सेवा पूर्ववत सुरू करतानाच प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन केले.

महापालिकेने जंतुनाशके उपलब्ध करून दिल्यानंतर वाहन, फवारणी व डिझेल खर्चासाठी राजकीय पक्ष, संघटना, स्वयंसेवी संस्था सरसावल्या आहेत. युवासेनेचे विनोद वाघ, समता परिषदेचे गुलाब पगारे, सुनील चौधरी, नगरसेवक कल्पना वाघ, गिरीश बोरसे, सोयगावचे माजी सरपंच जयराज बच्छाव आदींनी कार्यकर्त्यांच्या मदतीने आपापल्या प्रभागात फवारणी, धुरळणी केली.

शहरातील मोकळ्या मैदानांवर सोशल डिस्टन्सिंग ठेवून बाजार सुरू आहेत. संचारबंदीची कठोरपणे अंमलबजावणी होत आहे. बाजार समितीतील फळ व भाजीपाला लिलाव बंद असल्याने गर्दीला लगाम लागला होता.

 


ताज्या बातम्या