Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
दारू विक्री करणाऱ्या दोघांना मालेगावात अटक

दि . 01/04/2020

एक फरारी; ५७ हजारांचा ऐवज जप्त

मालेगाव : शहराजवळील सोयगाव स्मशानभूमीजवळ व वाके फाट्यावर अपर पोलिस अधीक्षक संदीप घुगे यांच्या विशेष पथकाने छापा टाकून बेकायदा देशी-विदेशी दारू विक्री करणाऱ्या दोघांना अटक केली. एक संशयित फरारी झाला.
पोलिसांनी दुचाकी, मोबाईल व दारूसह सुमारे ३२ हजारांचा ऐवज जप्त केला.
वाके फाट्यावर राकेश बच्छाव (वय २८, रा. वाके) हॉटेल गौरी पूनमच्या पाठीमागे बेकायदा दारू विक्री करताना मिळून आला.
पोलिसांनी बाराशे रुपयांच्या देशी दारूच्या २२ बाटल्या, पाच हजारांची रोकड, १५ हजारांची दुचाकी, चार हजारांचा मोबाईल असा सुमारे २५ हजारांचा ऐवज जप्त केला. याच पथकाने सोयगाव स्मशानभूमीजवळ छापा टाकून दुर्योधन सोनवणे (वय १९, रा. सोयगाव) याला अटक केली. अशोक गायकवाड (रा.करंजगव्हाण) फरारी झाला आहे.

पोलिसांनी सुमारे आठ हजारांची देशी-विदेशी दारूच्या बाटल्या जप्त केल्या. ही कारवाई सहाय्यक निरीक्षक सागर कोते, पोलीस शिपाई अभिजित साबळे, दिनेश शेरावते आदींनी केली. छावणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.


ताज्या बातम्या