Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
दिल्लीतल्या निजामुद्दिनच्या कार्यक्रमात महाराष्ट्रातले १०० पेक्षा जास्त लोक सहभागी..

दि . 01/04/2020

दिल्लीच्या 'त्या' कार्यक्रमात महाराष्ट्रातील शंभरपेक्षा जास्त सहभागी

दिल्लीतल्या निजामुद्दीन इथली मुस्लिम संस्था तबलिगी जमातच्या धार्मिक कार्यक्रमात हजारो लोक सहभागी झाले होते. महाराष्ट्रातूनही या कार्य्रकमाला अनेकजण उपस्थित होते, अशी माहिती समोर आली आहे.

एबीपी माझाच्या वृत्तानुसार महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील अनेकजण या कार्य्रकमाला उपस्थित होते. पोलीस आणि आरोग्य यंत्रणांतर्फे त्यांचा शोध घेतला जात आहे. दिल्लीच्या कार्यक्रमात सहभागी झालेले औरंगाबादचे 47 जण शहरात परतले आहेत. त्यातील 40 जणांची तपासणी करण्यात आली आहे.

पुणे आणि पिंपरी चिंचवड मिळून 136 जण या कार्यक्रमात सहभागी झाले होते. या सगळ्यांचा शोध घेऊन पुढील उपचार सुरू करण्यात आले आहेत.

याव्यतिरिक्त सोलापूर जिल्ह्यातील 16, नांदेड जिल्ह्यातील 13 तर परभणी जिल्ह्यातील तीन जण, अकोला जिल्ह्यातील 10 आणि चंद्रपूरच्या एकाचा यात सहभाग होता असं या वृत्तात म्हटलं आहे.

BBC वृत्त 


ताज्या बातम्या