Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
रुग्णालयातील सुविधांचा समितीकडून आढावा ; मालेगावात सुविधा अपुऱ्या भामरेंचा आरोप…

दि . 01/04/2020

मालेगाव- शहरातील सामान्य रुग्णलयातील सोयी सुविधाबाबत न्यायालयीन आदेशानुसार गठीत समितीची आढावा बैठक मंगळवारी ( दि३१) येथील प्रांताधिकारी कार्यालयात दुपारी पार पडली. करोनाच्या पार्श्वभूमीवर व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे ही बैठक घेण्यात आली. यावेळी बैठकीत आ. मौलाना मुफ्ती, अपर जिल्हाधिकारी लक्ष्मण राऊत, आयुक्त किशोर बोर्डे, प्रांत विजयानंद शर्मा, वैद्यकीय अधिक्षक डॉ.किशोर डांगे, मनपा आरोग्य अधिकारी डॉ.सायका अन्सारी, याचिकाकर्ते मनसे शहराध्यक्ष राकेश भामरे आदी उपस्थित होते. तर नाशिक येथून विभागीय उपायुक्त रघुनाथ गावडे, उपसंचालिका संगीता धायगुडे उपस्थित होत्या.
बैठकीच्या प्रारंभी करोनाच्या पार्श्वभूमीवर शहरातील सामान्य रुग्णालय, मनपा रुग्णालयात काय व्यवस्था करण्यात आली याविषयी माहिती घेण्यात आली. पालिका आयुक्त बोर्डे, डॉ.डांगे आदींनी असोलेशन वार्ड आदींची माहिती दिली. तसेच अन्य उपाययोजना विषयी आढावा घेण्यात आला. तसेच समितीच्या वेळोवेळी झालेल्या बैठकीनंतर सामान्य रुग्णालयात सुविधा करण्यात आल्याचा दावा सामान्य रुग्णालय प्रशासने दावा केला.यावेळी बैठकीत उपस्थित याचिकाकर्ते भामरे यांनी मात्र काही आक्षेप नोंदवले. २०१५ पासून दाखल याचिकेवर कारवाई सुरू आहे. मात्र सामान्य रुग्णालय स्थिती जैसे थे आहे. ११३ जागा आद्यप रिक्त असून मनपाच्या १७ जागा रिक्त आहेत. सामान्य रुग्णालयातील ६ पैकी ४ व्हेंटिलेटर बंद असुन केवळ २ सुरू आहेत. मनपा रुग्णालयात एकही व्हेंटिलेटर नाही. सर्वत्र करोनाचे सावट असतांना मालेगावतील आरोग्य यंत्रणा सक्षम नसल्याचे भामरे यांनी अधोरेखित केले. तर आ.मुफ्ती यांनी सामान्य रुग्णालयात आजही जिल्हाबंदी असताना रुग्ण धुळे पाठवली जात असल्याचा आक्षेप नोंदवला. आयुक्त बोर्डे यांनी मनपा आरोग्य विभागातील रिक्त जागा लवकरच त्या भरल्या जातील असे सांगितले.


ताज्या बातम्या