Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
मालेगाव - सोशल मिडीयावरुन अफवा पसरवणाऱ्या विरुध्द गुन्हा दाखल..

दि . 31/03/2020

मालेगाव । कोरोना विषाणू संदर्भात सोशल मिडियावरून खोटी माहिती पसरवित जनसामान्यांना घाबरून सोडणार्या समाजकंटका विरुद्ध पोलीसांनी मोहीम सुरू केली आहे. मालेगावी कोरोनाचे सहा रुग्ण सापडल्याचे खोटे वृत्त ट्विटर वरून प्रसारीत करणाऱ्या विरूध्द पवारवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कोरोना विषाणू संसर्ग पार्श्वभूमीवर समाज माध्यमतून खोटी माहिती प्रसारित करून जनसामान्यांना घाबरून सोडण्याचे प्रकार वाढले आहेत. गेल्या २६ मार्च रोजी शहरातील बिस्मिल्ला बाग भागात सहा रूग्ण सापडल्याची आफवा शहरात पसरली होती. या प्रकाराची नाशिक येथील पोलीस सायबर सेल मध्ये या ट्रिटर वरून प्रसारित करण्यात आलेल्या विडीओची शहनिशा सायबर सेलचे पोलीस उपनिरीक्षक कल्पेश दाभाडे व पो.शि. प्रकाश मोरे यांनी केली. तपासणीअंती सदर विडिओ हा मालेगाव येथील सिद्धार्थ राजेंद्र पटाईत याने सोशल मीडिया वरून पाठविला असल्याचे समोर आले. पोलिसांनी सिद्धार्थ पटाईत विरुद्ध पवारवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.


ताज्या बातम्या