Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
त्यांनी मागितले मूठभर धान्य, दात्यांनी पाठवल्या गोण्याच..

दि . 31/03/2020

मालेगावी दोन हजार कुटुंबांना आठ दिवसाच्या धान्य पाकिटांचे वाटप ,मालेगावात एकता मंडळाचा स्तुत्य उपक्रम..

मालेगाव- करोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र लॉक डाऊन असल्याने अनेक गोरगरीब कुटुंबांना मदतीसाठी शहरातील सामाजिक संस्था लोकप्रतिनिधी पुढे येत आहेत. आम्ही मालेगावकर संघर्ष समितीच्या वतीने कॅम्प परिसरातील गरीब व गरजू कुटुंबांना सोमवारी ( दि. ३०) रोजी धान्य व डाळींचे मोफत वाटप करण्यात आले. तसेच शहरातील नगरसेवक सुनील गायकवाड व मदन गायकवाड यांच्या पुढाकाराने सटाणा नाका परिसरातील एकता मंडळातर्फे ' एक मूठ धान्य गरिबांसाठी' हा उपक्रम हाती घेण्यात आला होता. यास शहरातील दानशूर व्यक्तींनी चांगला प्रतिसाद दिला. यातून जमा झालेल्या धान्य, डाळी तसेच किराणा सामनाचे तब्बल २ हजार किट तयार करण्यात आले. याचे वाटप कृषिमंत्री दादा भुसे यांच्या उपस्थितीत करण्यात आले. यावेळी भाजप पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.


ताज्या बातम्या