Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
कोरोनाला घाबरून न जाता,काळजी घ्या आणि घरातच थांबा- खा.सुभाष भामरे..

दि . 30/03/2020

मालेगाव- जिल्ह्यात एक करोनाबाधित रुग्ण आढळून आल्याने मालेगाव व परिसरात देखील चिंता वाढली आहे. दरम्यान सोमवारी ( दि३०) येथील सामान्य रुग्णालयात करोना संशयितांची संख्या एकदम वाढून ६ पर्यंत गेल्याने आरोग्य यंत्रणेची चिंता वाढली आहे. दरम्यान या पार्श्वभूमीवर खा. डॉ.सुभाष भामरे यांनी रविवारी सायंकाळी येथील सामान्य रुग्णालयात भेट देऊन करोनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाच्या तयारीचा आढावा घेतला.यावेळी वैद्यकीय अधिक्षक डॉ. किशोर डांगे, पालिका आयुक्त किशोर बोर्डे, डॉ. भीमराव त्रिभुवन, भाजपचे सुरेश निकम, लकी गिल, निलेश कचवे आदींसह मनपा, सामान्य रुग्णालय प्रशासन अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. यावेळी बैठकी दरम्यान खा. डॉ. भामरे यांनी करोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता मालेगावी आरोग्य यंत्रणांनी सज्ज राहावे आशा सूचना केल्यात. सामन्य रुग्णालयात असलेले आयसोलेशन बेड, व्हेंटिलेटर, मास्क, डॉक्टर्स युनिफॉर्म या सगळ्याची काय व्यवस्था आहे याचा आढावा घेतला. तसेच आयसोलेशन वार्डची संख्या वाढवण्यासाठी शहरानजीक मनमाड चौफुली येथे असलेले जीवन हॉस्पिटल व महिला व बाल रुग्णालयात व्यवस्था करण्यात यावी आशा सूचना केल्यात.खा.डॉ.भामरे पत्रकारांनाही बोलताना म्हणाले की, करोनाला घाबरून जाण्याची गरज नाही. परंतु नागरिकांनी खबरदारी घेणे, घरात राहणे, लॉक डाऊन चे नियम पाळणे गरजेचे आहे. देशात परिस्थिती गंभीर असून नागरिकांनी गांभीर्य ओळखावे. सरकार गरिबांना रेशन देणारच आहे. तरी देखील आजूबाजूला उपाशी असलेल्यांना मदत करावी. परदेशातून, बाहेरगावाहून आलेल्यांची माहिती प्रशासनाला द्यावी असे आवाहन त्यांनी केले.


ताज्या बातम्या