Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
मुंबईच्या भाजीपाल्यासाठी कृषी मंत्र्यांचा पुढाकार, मालेगावातुन भाजीपाला पॅकिंग करून पाठवले मुंबईला..

दि . 30/03/2020

मालेगाव- करोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र लॉक डाऊनची स्थिती असून मुंबईसह उपनगरात भाजीपाल्याची कमतरता पडू नये यासाठी स्वतः कृषीमंत्री दादा भुसे यांनी येथील बाजार समिती आवारात उपस्थित राहून उपलब्ध भाजीपाल्याचे पॅकेजिंग करून वाहने मुंबईच्या दिशेने रविवारी( दि २९) रवाना केलीत.करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मुंबईतील भाजी मार्केट बंद ठेवण्यात आले होते. मात्र ते पुन्हा सुरू करण्यात आल्यावर नागरिकांनी मोठी गर्दी केल्याचे चित्र पाहायला मिळाले होते. त्यामुळे आता मुंबईत घरपोच भाजीपाला पोहचवण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. याच उपक्रमाचा एक भाग म्हणून मालेगाव व परिसरातून उपलब्ध होणार भाजीपाला योग्य पद्धतीने पॅकेजिंग करून मुंबईकारांचा घरापर्यंत पोहचावा यासाठी कृषीमंत्री दादा भुसे यांनी पुढाकार घेतला.येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातून मंत्री  दादा भुसे यांच्यासह चिरंजीव आविष्कार भुसे, राजेंद्र अलीझड आदींसह कार्यकर्ते, पदाधिकारी यांनी रविवारी हा भाजीपाला वाहनांमध्ये पॅकेजिंग करून भरून रवाना केला. नागरिकांनी घराबाहेर पडू नये, गर्दी करू नये यासाठी असे उपक्रम हाती घेण्यात येत असल्याचे मंत्री भुसे यांनी सांगितले. मालेगाव शहरात देखील असा उपक्रम राबविला जाणार आहे.


ताज्या बातम्या