Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
मालेगाव - शासकीय रुग्णालयात आमदारांचे ते कत्य गंडगिरीचे...

दि . 30/03/2020

मालेगाव देश कोरोना सारख्या विश्वव्यापी संकटाशी सामना देत आहे. राज्यात सर्वत्र संचारबंदी लागू करण्यात आली असताना मालेगावचे आमदार शासकीय नियम व कायदा धाब्यावर बसून गुंडगिरीला प्रोत्साहन देत असल्याचा आरोप येथील माजी महापौर रशीद शेख व काँग्रेस प्रवक्ते साबीर गोहर यांनी केला आहे.

मालेगाव बाह्य आ. मुफ्ती महमद इस्माईल यांनी आपल्या सोबत कार्यकर्ते व समर्थकांचा जमाव घेऊन सामान्य रूग्णालयात धुडगूस घालीत तेथे कामावर असलेल्या वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना मारहाण केली. एका जबाबदार लोकप्रतिनिधीचे हे कृत्य अतिशय निंदनीय आहे. आज देश मोठ्या संकटातून जात आहे. मात्र आपले राजकारण जिवंत ठेवण्यासाठी मौलाना कोणत्याही स्तरावर जाऊ शकतात हे या प्रकारावरून स्पष्ट झाले आहे. धार्मिक वाद निर्माण करून शहराला वेठीस धरणे हा त्यांचा नेहमीचा प्रकार आहे. या प्रकाराने शहरातील कायदा व सुव्यवस्था धोक्यात येऊ शकते.याची जाण ते ठेवत नाहीत. त्यांच्या विरूद्ध विधानसभेत हक्कभंग प्रस्ताव दाखल करण्यात यावा. पोलिसांनी त्यांच्यासह सहकार्या विरूद्ध गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करावी अशी मागणी माजी आमदार रशिद शेख व साबीर गोहर यांनी केली आहे.


ताज्या बातम्या