Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
कोरोनाचा नाशिक जिल्ह्यात पहिला पॉझिटिव्ह रुग्ण.

दि . 29/03/2020

राज्यात करोनाचा प्रादुर्भाव वाढू लागलेला असून एकूण रुग्णांची संख्या २०० जवळ जाऊन पोहोचली आहे. मात्र, अजून देखील नाशिकमध्ये कोरोनाचे रुग्ण सापडले नव्हते. आता मात्र नाशिकमध्ये पहिला कोरोना रुग्ण सापडला आहे. विषेश म्हणजे, या रुग्णाला परदेश प्रवासाची कोणतीही पार्श्वभूमी नाही. त्यामुळे या रुग्णाने प्रशासनाची काळजी वाढवली आहे..एकूण ९ कोरोना संशयितांची नाशिकमध्ये चाचणी करण्यात आली होती. त्यातल्या ८ रुग्णांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले, पण एका रुग्णाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. नाशिकच्या लासलगावमधल्या निफाड तालुक्यातला हा कोरोनाग्रस्त रहिवासी आहे. ३० वर्षांच्या तरुणाला ही कोरोनाची लागण झाली असून निफाडच्या ग्रामीण भागात हा तरूण राहातो. दरम्यान, त्याच्यावर विशेष कोरोना कक्षामध्ये उपचार सुरू आहेत.
निफाडच्या लासलगावमधल्या नंदनवन नगर पिंपळगावजवळ हा ३० वर्षांचा तरूण राहातो. त्याला १२ मार्चला खोकला आणि तापाची लक्षणं दिसू लागली. तिथल्या डॉक्टरांच्या उपचारांनी फरक न पडल्यामुळे तो २५ मार्च रोजी लासलगावच्या ग्रामीण रुग्णालयात गेला. न्युमोनियाची लक्षणं वाटल्यामुळे त्याला नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आलं. २७ मार्चला तो तरूण स्वत:च्या वाहनाने नाशिकला उपचारांसाठी दाखल झाला. नाशिक जिल्हा रुग्णालयातल्या डॉक्टरांनी त्याला तातडीने आयसोलेशन वॉर्डमध्ये स्थलांतरीत केलं आणि त्याच्या घशातल्या स्त्रावांचे नमुने तपासणीसाठी पुण्याच्या लॅबमध्ये पाठवले. त्याचा अहवाल आता मिळाल्यानंतर त्याला कोरोनाची लागण झाल्याचं निष्पन्न झालं आहे. या तरुणाची प्रकृती स्थिर असून त्याला डॉक्टरांच्या निगराणीखाली ठेवण्यात आलं आहे.


ताज्या बातम्या