Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
संकटकालीन परीस्थित गरजूंना मदत करा; केदानाना आहेर….

दि . 29/03/2020

देवळा :(बाबा पवार) सध्या कोरोना विषाणूच्या प्रादुर्भामुळे सर्वत्र संचारबंदी  असल्याने जीवनावश्यक वस्तूंची दुकाने वगळता सर्वच बंद आहे .अश्या परीस्थित भाजपच्या नासिक जिल्हा भरातील सर्वच कार्यकर्त्यांनी गरजूंना मदत करावी असे आवाहन भाजपा जिल्हाध्यक्ष श्री केदानाना आहेर यांनी केले आहे . या आपत्तीच्या काळात मजूर, गोरगरीब, सर्वसामान्य जनता, परप्रांतीय मजूर ,बेघर गरीब यांना जेवणाची व्यवस्था कार्यकर्त्यांनी करावी तसेच भविष्यात रक्ताचा तुटवडा भासणार आहे त्या दृष्टीनेही आपण रक्तदात्यांना आवाहन करा व त्यांचा संपर्क नंबर घेऊन  गरज पडल्यास त्यांना रक्तदान करण्यासाठी बोलवावे, सरकारने गोरगरिबांसाठी ज्या घोषणा केल्या आहेत त्यांची माहिती गरजूंपर्यंत पोहचवावी. कुठलीही सामाजिक उपक्रम राबवतांना स्थानिक प्रशासकीय अधिकारी यांचेशी चर्चा करावी व त्यांची रीतसर परवानगी घ्यावी. जीवनावश्यक वस्तूंची खरेदी करण्यासाठी नागरिकांनी   सुरक्षित अंतरावरूनच मास्क बांधून खरेदी विक्री करावी . तसेच ह्या कठीण समयी कार्यकर्त्यानी व नागरिकांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आव्हानाला प्रतिसाद द्यावा व पंतप्रधान केअर्स निधीसाठी सढळ हाताने मदत करावी तसेच ह्या लॉक डाऊन च्या काळात सर्व सुजाण नागरिकांनी  विनाकारण घराबाहेर न पडण्याचेही आवाहन केदानाना आहेर यांनी केले.


ताज्या बातम्या