Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
नगरसेवक बोरसे यांची स्वखर्चाने ट्रॅक्टर फवारणी

दि . 29/03/2020

मालेगाव :- कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाने उपाययोजना केल्या असल्यातरी आपआपली जबाबदारी ओळखून काही सामाजिक संस्था देखील पुढे सरसावल्या आहेत. शहरातील महापालिकेचे नगरसेवक अॅड. गिरीश बोरसे यांनी देखील याचे गांभीर्य ओळखत आपल्या वॉर्डातील प्रत्येक भागात स्वखर्चाने ट्रॅक्टरद्वारे फवारणी केली.

पहिल्या दिवशी बोरसे यांनी सोमवार वॉर्ड भागातील गुरव गल्ली, भावसार गल्ली, मामलेदार गल्ली, पाच कंदील, आझाद चौक, वृंदावन चौक, इस्लामाबाद परीसरात फवारणी केली. तर दुसऱ्यादिवशी एकात्मता चौक येथील भाजी मार्केट, शासकीय विश्रामगृह, छावणी पोलीस कॉटर्स, अयोध्या नगर, स्वप्नपूर्ती नगर, विजय नगर, बोरसे नगर, पटेल नगर, भुसे कॉलनी, कलेक्टर पट्टा परिसरातील आदी सर्व भागात माजी सरपंच जयराज बच्छाव व बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रतिबंधक औषध फवारणी केली.


ताज्या बातम्या