Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
आधी जन्म कोरोना चाचणी किटचा, नंतर बाळाचा ; पुण्यातील डॉ. मीनल भोसले यांची अभिमानास्पद कामगिरी

दि . 29/03/2020

साडेसात महिन्याच्या गर्भवती असताना सुद्धा अहोरात्र मेहनत घेत पुण्यातील मीनल डाखवे-भोसले यांनी कोरोना चाचणींचं किट तयार केले आहे.  या किटमुळे कोरोनाची चाचणी फक्त १२०० रुपयांमध्ये होणार आहे. सध्या या चाचणीला ४५०० रुपयांपर्यंत खर्च येत आहे.

कोरोना चाचणीचं हे किट्च संशोदन आणि त्याचा विकास बाणेर येथे, तर उत्पादन लोणावळा येथे मायलॅब डिस्कव्हरी सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने विकसित केले आहे. कमी वेळात आणि स्वस्तात हे किट्स विकसित करण्याचे श्रेय मराठमोळ्या डाॅ.मीनल भोसले यांना जाते.  

या कंपनीकडून आत्ता दररोज दहा हजार किट्सची निर्मिती करण्यात येत आहे.आगामी काळात त्यामध्ये वाढ करून दररोज पंचवीस हजार किट्स तयार करण्यात येणार आहेत.

मीनल भोसले यांनी हे किट विकसित केल्याच्या दुसऱ्या दिवशीच  बाळाला जन्म दिला. ‘आधी लगीन कोंढाण्याचं मग माझ्या रायबाचं’ या उक्तीप्रमाणे आधी कोरोना चाचणीचे किट आणि नंतर बाळाला जन्म याची प्रचिती मीनल यांच्या कामगिरी तून दिसून आली. मीनल यांनी बनवलेलं किट एकाचवेळी १०० टेस्ट करण्याइतकं सक्षम आहे. मायलॅबनं तयार केलेल्या किटला आयसीएमआरनं मान्यता दिलीय. भारतीय कंपनीनं तयार केलेलं आणि १०० टक्के अचूक रिझल्ट देणारं एकमेव किट असल्याचंही आयसीएमआरनं म्हटलंय.


ताज्या बातम्या