Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
अवैध दारू विक्री अड्ड्यावर सटाणा पोलिसांची कार्यवाही

दि . 29/03/2020

सटाणा:- कोरोना च्या पार्श्वभुमीवर संचार बंदी लागू आहे त्यात तळीरामांचे मोठे हाल होत आहेत.घसा ओला करण्यासाठी तळीराम दारूच्या शोधात गल्ली बोळात फीरत आहेत काळू नानाजी नगर मध्ये पोलिसांना सुगावा लागल्याने चोरटी दारू विक्री करणा-या एकास गजाआड केले.व कडक तंबी देऊन यापुढे गुन्हा दाखल केला जाईल असा लेखी समंस देऊन सोडून देण्यात आले.
सटाणा शहर व बागलाण तालुक्यातीत सायकाळी मध्य पान करणा-यांचे पाय सायकाळच्या वेळी वाईन शाँप कडे वळायचे संचार बंदी असल्याने सर्वच दारू दुकाने,बार बंद आहेत.दुधावरची तहान ताकावर भागविण्याचा प्रयत्न काही दिवसांपासून मध्यपान करणा-यांचा सुरू आहे.उच्च प्रतिचे मध्यपान करणारे देशी व गावठी कुठे मिळते का यासाठी ठराविक ठिकांनी शोध घेत आहेत.असाच प्रकार काळू नानाजी नगर मध्ये पत्र्याच्या शेड मध्ये दारू विक्री सुरू असल्याची गोपनीय माहीत पोलिसांना मिळाली ग्राहक म्हणून साध्या वेशात पोलिस या ठिकानी पोहचलेत.पैसे देऊन दारु घेतलीही दोन मिनट उभे राहुन निरीक्षण केले असता दारूचा साठा या ठिकाणी आढळला पोलिसांनी तात्काळ संबंधित दारू विक्री करणाऱ्या ला पकडले आणी दारुसाठा जप्त केला.
दारूविक्री करणाऱ्या व्यक्ती ला काहीतास गजाआड ठेवले सायंकाळी पोलिसी भाषेत कडक तंबी देऊन लेखीआदेशा वरून या पुढे दारूविक्री करतांना आढळल्यास कायदेशीर गुन्हा दाखल केला समंस दिला.या प्रकाराची वार्ता वा-यासारखी पसरल्याने चोरून लपून दारू विक्री करणा-यांचे धाबे दणाणले आहेत।


ताज्या बातम्या