Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
मालेगावातून ठाणे शहरास १६०० पाकिटे भाजीपाला

दि . 29/03/2020

मालेगाव येथून ठाणे शहरासाठी पॅकिंग करण्यात आलेला भाजीपाला.

प्रतिनिधी | मालेगाव : तालुक्यातून ठाणे शहरात शनिवारी आठ टन भाजीपाला पाठविला आहे. 'ना नफा, ना तोटा' या तत्त्वावर शिवसेनेतले ही सेवा दिली आहे.

आठ भाज्यांचे पॅकेज असलेली १६०० पाकिटे पाठविण्यात येत आहेत.

कृषिमंत्री दादा भुसे यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविण्यात येत आहे. ठाण्याचे आमदार प्रताप सरनाईक यांनी यासाठी भुसे यांना विनंती केली होती. त्यानुसार भुसे यांनी 'ना नफा, ना तोटा' या तत्त्वावर मालेगाव तालुक्यातून भाजीपाला उपलब्ध करून दिला आहे.
हा पॅकेज स्वरूपात आहे. यात सहा किलोच्या एका पाकिटात कांदे, बटाटे, शेवगा, टोमॅटो, हिरवी मिरची, कोबी, भोपळा, शिमला मिरची या भाज्या आहेत. एका कुटुंबाला आठवडाभर पुरेल असे एक भाजी पाकीट तयार करण्यात आले आहे.
आयशर गाडीतून हा भाजीपाला ठाण्याकडे रवाना झाला. रविवारी सकाळी पोहोचेल. त्या भागात आमदार सरनाईक यांचे कार्यकर्ते त्याचे वितरण करतील, त्यांच्या मागणीनुसार दररोज भाजीपाला पाठवण्यात येणार असल्याचे या उपक्रमाचे प्रमुख देवा वाघ यांनी सांगितले.


ताज्या बातम्या