Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
मालेगावला रुग्णालय सुविधा आढावा समितीची बैठक

दि . 29/03/2020

मालेगाव, ता. २८ : येथील सामान्य रुग्णालयातील सोयी-सुविधा, अपुरे मनुष्यबळ याबाबत उच्च न्यायालयाच्या आदेशाने स्थापन झालेल्या आढावा समितीची बैठक मंगळवारी (ता.३१) होणार आहे. 
नाशिक विभागीय आयुक्तांच्या आदेशानुसार येथील प्रांत कार्यालयात दुपारी बाराला व्हीसीच्या माध्यमातून ही बैठक होईल. मनपा आयुक्त किशोर बोर्डे व संबंधिताना याबाबत संदेश आला आहे.
मनसेचे अध्यक्ष राकेश भामरे यांच्या जनहित याचिकेवर न्यायालयाने ही समिती गठीत केली आहे. समितीच्या यापूर्वी दहा बैठका झाल्या आहेत.
यात रुग्णालयात नव्याने झालेल्या सोयीसुविधा, कर्मचारी नियुक्ती व रिक्त पदे, आवश्यक सुविधा आदींचा आढावा स्थानिक लोकप्रतिनिधी, संबंधित अधिकारी व याचिकाकर्त्यांच्या उपस्थितीत घेतला जातो.


ताज्या बातम्या