Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
मालेगाव येथे ०६ कोरोनारूग्ण सापडले, सोशल मिडीयावर अफवा पसरवणा-या आरोपीविरुध्द गुन्हा दाखल....

दि . 29/03/2020

मालेगाव - कोरोना पार्श्वभुमीवर शासनातर्फे २१ दिवसीचा लॉकडाऊन पुकारण्यात आलेला आहे. त्यानुसार संपुर्ण भारतासह नाशिक ग्रामीण जिल्हयात संचारबंदी लागु आहे. तसेच कोरोना व्हायरस बाबत कोणतेही प्रसारण मा. जिल्हाधिकारी, नाशिक यांचे आदेशाशिवाय प्रसारित करू नये असे आदेश देखील निर्गमित करण्यात आलेले आहेत. दि. 26 मार्च रोजी टिवीटर या सोशल मीडिया माध्यमाद्वारे बिसमील्ला बाग, मालेगाव (नाशिक) येथे सहा कोरोना रुग्ण सापडले असा मजकुर व्हिडीओसह प्रसारीत करून अफवा पसरवणा-या आरोपीविरूध्द मालेगाव येथील पवारवाडी पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
दि. 26 मार्च  रोजी ट्विीटर अकाउंटवारे प्रसारीत झालेला सदर संदेश वेगाने व्हायरल झाला होता व लोकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले होते. या गोष्टीवी दखल पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण डॉ. आरती सिंह यांनी गांभीर्यानी घेतली. त्यांचे मार्गदर्शनाखाली सायबर पोलीस स्टेशन, नाशिक ग्रामीण कडील पोलीस अधीकारी पोउपनि कल्पेश दाभाडे व पो.शि प्रकाश मोरे यांनी तांत्रिक विश्लेषण करून माहिती घेतली असता सदर संदेश व क्लिपमधील माहीती खोटी असुन अफवा पसरविणारी असल्याचे स्पष्ट झाले व सदर अफवा आरोपी नामे सिध्दार्थ राजेंद्र पटाईत, रा. मालेगाव, नाशिक याने पसरविल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे त्याचेविरूद पवारवाडी पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास पोलीस करीत आहेत.
नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ. आरती सिंह यांचेकडुन सर्वांना आवाहन करण्यात येत आहे कि, कोरोना पार्श्वभुमीवर सोशल मिडीयावर सायबर पोलीसांची करडी नजर असुन कुणीही अफवा पसखु नका. सोशल मिडीयावर अफवा पसरवल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येईल.


ताज्या बातम्या