Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
कोरोनापेक्षाही लोकांना करणीचीच जास्त भिती ; अंधश्रद्धा निर्मूलन व वैज्ञानिक दृष्टीकोन समितीच्या वतीने पर्दाफास..

दि . 29/03/2020

मालेगांव येथुन जवळच असलेल्या रोकडोबा वस्तीवर  यांच्या घरासमोर कुणीतरी अज्ञात व्यक्तिने मध्यरात्री करणी करण्यासाठीचे साहित्य ठेवुन अंधश्रद्धा पसरवुन दहशत निर्माण केल्याचा प्रयत्न केला.तेथे अंधश्रद्धा निर्मूलन व वैज्ञानिक दृष्टीकोन समितीचे अध्यक्ष तानाजी शिंदे यांनी जाऊन करणीचे साहित्य जमा करुन घेतले.कोरोनामुळे गर्दी होऊ न देता लोकांना लांबुनच अंधश्रद्धेवर  मार्गदर्शन करुन वरील प्रतिपादन केले.
सगळीकडे कोरोनाची दहशत असतांना मालेगांवला लागुन असलेल्या रोकडोबा वस्ती येथे अंधश्रद्धेमुळे लोकांत दहशत निर्माण झाली,येथील प्रविण वसंत माळी यांच्या दारात,चुका ठोकलेले लिंबु,काळी बाहुली,मडके,शेणाने बनवलेली बाहुलीला चुका ठोकलेल्या होत्या तसेच लाल फडके व मडके असे साहित्य हळद कुंकू लावुन दाराच्या पायरीवर ठेवलेले आढळून आल्यामुळे वस्तीवर अचानक दहशत निर्माण झाली.वस्तीवरील पं.सं सदस्या कमळााबाई मोरे याांचे पती वसंत मोरे यांनी दाभाडी येथील अखिल भारतीय मराठा महासंघाचे हरी निकम यांच्याशी व पोलिसांशी संपर्क साधून वस्तीवरील परिस्थितीची जाणीव करुन दिली,संघाचे कार्यकर्त्यांनी अंधश्रद्धा निर्मूलन व वैज्ञानिक दृष्टीकोन समितीचे अध्यक्ष तानाजी शिंदे यांना संपर्क करुन परिस्थिती सांगितली तानाजी शिंदे यांनी कोरोनामुळे गर्दी होनार नाही याची दक्षता घेत असल्यास लगेच येण्याचे सांगितले,दाभाडी येथील अखिल भारतीय मराठा महासंघाचे हरी निकम व तानाजी शिंदे हे घटनास्थळी गेले,तानाजी शिंदे यांनी सर्व करणीचे साहित्य जमा केले त्यात असलेले लिंबु तेथेच खाल्ले व कोरोनाला घाबरा,करणीला नको असे वक्तव्य केले.कोरोना व  संचारबंदीमुळे गर्दी न होवु देता प्रकरण मिटवले,वस्तीवरील करणीचे साहित्य नेल्यामुळे वस्तीवरील लोकांनी सुटकेचा श्वास घेतला.


ताज्या बातम्या