Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
शहर व तालुक्यात विजेचा लपंडाव ; कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या लॉकडाऊनच्या अडचणीत भर...

दि . 28/03/2020

मालेगाव :- कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून संपूर्ण देश लॉक डाऊन घोषित करण्यात आला आहे. अश्या परिस्थितीत सर्व प्रशासनाकडून नागरिकांना आवाहन करून घरीच राहण्याचे निर्देश देण्यात येत आहे. हीच परिस्थिती मालेगाव शहर व तालुक्यात देखील पहावयास मिळत आहे. मात्र अश्या या बिकट परिस्थितीत मालेगाव शहर व तालुक्यातील विज वितरण कंपनीकडून विजेचा सतत सुरू असलेला लपंडाव बघता नागरीक यामुळे अक्षरशः कंटाळले आहे. 

गेल्या अनेक दिवसांपासून मालेगाव शहरासह तालुक्यात वेळीअवेळी विज खंडित होत असल्याने नागरीक त्रस्त झाले आहे. उन्हाळा वाढू लागल्याने घरा घरात कुलर व पंखे या साधनांची गरज वाढू लागली आहे. त्यात महापालिकेच्या कृपेने शहरात डासांचे प्रमाण देखील वाढले आहे. अशा परिस्थितीत विज वितरण कंपनीकडून सतत विज पुरवठा खंडित होत असल्याने नागरिकांमध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटत असून प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष घातल्यास नागरिकांना घरीच बसा..असे आवाहन करण्याची वेळ देखील येणार  नाही. शहरातील विजेचे खाजगीकरण झाल्यापासून विज पुरवठा खंडित होण्याचे प्रकार वाढले असून या कंपनीच्या अधिकाऱ्यांना याचे गांभीर्य लक्षात येत नाही का? असा सवाल उपस्थित होत आहे.


ताज्या बातम्या