Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
सोयगावातील मर्द मावळा ग्रुपतर्फे फवारणी

दि . 27/03/2020

मालेगाव : सोयगाव पार्श्वनाथनगर येथील मर्द मावळा ग्रुपच्या कार्यकर्त्यांनी शुक्रवारी (दि.२७) रोजी परिसरात स्वखर्चातून फवारणी केली.
येथील पार्श्वनाथ नगर , तुळजाई कॉलनी, पवन नगर, जिजामाता नगर , के के नगर ,गणेश कॉलनी तसेच परिसर निर्जंतुकीकरण करण्यासाठी मर्द मावळा ग्रुपच्या सर्व कार्यकर्त्यांनी तोंडाला मास्क लावत स्वतः  पुढाकार घेत परिसरातील नागरिकांच्या आरोग्याचा विचार करून फवारणी केली. यावेळी त्यांनी नागरिकांना मास्क वाटप करत घरातच राहण्याचा सल्ला दिला. व करोना आजारासंदर्भात जनजागृती केली. यावेळी संस्थापक  संदीप  बोरसे, अक्षय बच्छाव, नंदू बच्छाव, योगेश आहिरे, महेश पवार, आदर्श बच्छाव, नाना मोरे, राकेश  चव्हाण, जगदीश शेलार, मनोज भामरे, स्वप्नील शिसव, योगेश खैरनार, हितेश अाहिरे, रविराज चव्हाण, शुभम आहीरे, आकाश खैरनार आदींनी यासाठी परिश्रम घेतले.


ताज्या बातम्या