Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर RBI चे सर्वात मोठे निर्णय....

दि . 27/03/2020

रेपो आणि रिव्हर्स रेपो रेटच्या दरात कपात..

रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शशिकांत दास यांनी पत्रकार परिषद घेतली. यामध्ये त्यांनी आर्थिक क्षेत्रासंबंधीत अनेक घोषणा केल्या. कोरोना विरुद्ध लढण्यासाठी आरबीआयने निर्णय घेतला आहे.

 

कोरोना विषाणूमुळे अनेक क्षेत्रांना आर्थिक फटका बसल्याचं शशिकांत दास म्हणाले. जीडीपीचं अपेक्षित उद्दिष्ठ गाठणं आव्हानात्मक असल्याचं शशिकांत दास म्हणाले.

 

 

आरबीआयने रेपो दरात कपात करण्याचा निर्णय घेतला. रेपो दरात 0.75 बेसिस पॉईंटची कपात केली. यामुळे आता रेपो रेट हा 5.15 वरुन 4.4 वर आला आहे.

तर रिव्हर्स रेपो रेटमध्ये 90 पॉ़ईंटने कपात केली आहे. यामुळे रिव्हर्स रेपो दर हा 4 टक्के इतका असेल.

अल्पमुदतीच्या कर्जावरील व्याजदरातही कपात करण्यात आली आहे. यामुळे आता कर्जाच्या हफत्याची रक्कम कमी होणार आहे.

काय म्हणाले गव्हर्नर ?

कोरोनामुळे मागणी कमी होऊन महागाई वाढण्याती शक्यता शशिकांत दास यांनी वर्तवली. गृह आणि वाहन कर्जावरील ईएमआयच्या रक्कमेत कमी होणार.

सरकारी बँकांचे व्याजदर घटणार.

 

कोरोनामुळे जगावर मंदीचे सावट

 

सर्व कर्जाचे हफ्ते ३ महिने स्थगित

 

ईएमआय ३ महिने स्थगित करण्यासंदर्भात बँकांना विनंती

 

 


ताज्या बातम्या