Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
मालेगाव तालुका मराठी पत्रकार संघा तर्फे शहरातील पोलिस, एसआरपी बांधवांनाना खिचडी, नाश्ता वाटप..

दि . 26/03/2020

मालेगाव । प्रतिनिधी । कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दि.२४ मार्चच्या रात्री देशात लॉकडाऊनची घोषणा केेली आहे. त्यामुळे देशासह राज्य व शहराशहरात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. असाच बंदोबस्त मालेगाव शहरात देखील ठेवण्यात आला आहे. बंदोबस्तावरील पोलीसांच्या जेवनाची हेळसांड होऊ नये म्हणून अ. भा. पत्रकाल परिषदेच्या जिल्हा मराठी पत्रकार संघांतंर्गत मालेगाव तालुका पत्रकार संघातर्फे खिचडीचे वाटप करण्यात आले.

जगात कोरोना विषाणूने धुमाकुळ घातला आहे. हा कोरोना विषाणू भारतात ही आला असून आतापर्यंत देशात १५ जणांना प्राण गमवावे लागले आहेत. कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव वाढू नये म्हणून केंद्र व राज्य शासन विविध उपाय योजना करीत आहेत. त्यातंर्गत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात कलम १४४ लागू करून संचारबंदीची घोषणा केली. देशात कोरोनाचा प्रादूर्भाव वाढू नये म्हणून पंतप्रधान मोदी यांनी देशात लाँकडाऊनची घोषणा केली. त्यामुळे शहराशहरातील पोलिस दलाची ड्युटी व काम वाढले आहे.शहरात पोलीस, एसआरपींचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
       बंदोबस्तावरील पोलीस बांधव जवानांना वेळेवर जेवन व नाश्ता मिळावा म्हणून मालेगाव तालुका मराठी पत्रकार संघाच्यावतीने पोलीसांना खिचडीचे वाटप करण्यात आले. यावेळी पत्रकार संघाचे मालेगाव तालुकाध्यक्ष चेतन महाजन, सरचिटणीस मनोहर शेवाळे, सदस्य राकेश भामरे, निवृत्ती बागूल, समिर दोषी, हेमंत धामणे, नीलेश शिंपी आदी पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते देवा पाटील, मुकेश झुणझुणवला सदस्य उपस्थित होते.


ताज्या बातम्या