Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
मालेगावातील अब्दूल्लाह बागच्या कोरोनाच्या संदर्भातील व्हायरल व्हिडिओ मागची सत्यता...आवर्जून वाचा..

दि . 26/03/2020

मालेगाव :- येथील पवार वाडी पोलीस ठाणे हद्दीतील रझा पुरा भागातील अब्दुल्ला बाग परिसरातील झारखंड येथील रहिवासी असलेल्या  ५ कोरोना संशयित रुग्णांना येथील सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यात तीन महिला एक पुरुष व एका मुलाचा समावेश आहे.

संपूर्ण जगात कोरोना व्हायरसने थैमान घातले असून भारतात देखील या कोरोना व्हायरस ने धुमाकूळ घातला आहे. या पार्श्वभूमीवर संपूर्ण देश लॉकडाऊन करण्यात आला आहे. मालेगाव शहरात देखील ५१ संशयित रुग्णांना होम क्वारांटेन करण्यात आले असून काल सोमवार दि.२६ रोजी अब्दुल्ला बाग परिसरातील झारखंड येथील एका कुटुंबातील सदस्य दोन दिवसांपासून सतत खोकलत असल्याची तक्रार स्थानिक नागरिकांनी सामजिक कार्यकर्ते शफीक अँटीकरप्शन यांच्या कडे केली होती. या विषयीची माहिती  शफीक यांनी पवार वाडी पोलिस, मालेगाव मनपा प्रशासन ,मनपा आरोग्य अधिकारी तसेच वैद्यकीय अधिक्षक डॉ. किशोर डांगे यांना दिली होती. मात्र या यंत्रणेकडून कुठलीच दखल घेतली न गेल्याने अखेर शफीक यांनी काल  रात्री सुमारे २ वाजेच्या दरम्यान महापालिकेच्या रुग्णवाहिकेत सदर संशयित रुग्णांना येथील वाडिया रुग्णालयात दाखल करण्यासाठी नेले असता तेथील डॉक्टरांनी त्यांना सामान्य रुग्णालयात हलविले. सदर संशयित रुग्णांना येथील सामान्य रुग्णालयात उपचारसाठी दाखल करण्यात आले आहे. याविषयी संबंधित डॉक्टरांना संपर्क साधला असता त्यांनी योग्य माहिती दिली नाही.तरीही कसमादे अपडेटच्या माध्यमातून आपणास विनंती करतो कि कोणत्याही अफवांवर विश्वास ठेऊ नये. प्रशासन सज्ज असून त्यासाठी आरोग्य विभाग आणि शासन सर्वोतोपरी तत्पर आहेत.


ताज्या बातम्या