Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
डॉ. यशवंत पाटील यांचे मालेगाव पंचक्रोशीतील नागरिकांना आवाहन..

दि . 26/03/2020

मालेगाव : येथील अंजनी हॉस्पिटलचे डॉ.यशवंत पाटील हे विदेश दौऱ्यावर गेले होते. ते भारतात परत आल्यानंतर शहरातील काही उपद्रवी मुल्यांनी त्यांना कोरोना झाल्याची अफवा पसरविली. यामुळे डॉ.पाटील यांना मोठ्या प्रमाणावर मनस्ताप झाला. मात्र त्यांची तब्येत ठणठणीत असून त्यांनी सर्व प्रकारच्या चाचण्या केले असल्याची डॉ.पाटील यांनी सांगितले असून यासंबंधी त्यांनी नागरिकांना आवाहन देखील केले आहे.

डॉ. पाटील यांची प्रकृती एकदम ठणठणीत असुन त्यांनी विदेशातून आल्यावर आपल्या सर्व चाचण्या (टेस्ट) करून घेतल्या होत्या व आपण एक आदर्श पायंडा पाडावा म्हणून त्यांनी स्वतःला स्वतःच्या घरी सेल्फ क्वारंटाईन करून घेतले होते. ३० मार्च नंतर ते आपल्या सर्व नियोजित कामांना सुरुवात करणार असून ज्या महाभागांनी डॉ.पाटील यांच्या तब्येतीविषयी चुकीचे संदेश प्रसारित केले आहे, त्यांच्या विषयी यथावकाश सक्षम तक्रार घेतली जाणार असल्याचे डॉ.पाटील यांनी सांगितले आहे.
म्हणून सर्व मित्र परिवार, नातेवाईक , वैद्यकीय व्यावसायिक व हितचिंतकांनी याची नोंद घ्यावी व असा अपप्रचार करणारे नराधम हे समाजासाठी घातक असल्याचे देखील पाटील यांनी सांगितले आहे.


ताज्या बातम्या