Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
मालेगाव सामान्य रुग्णालयातील वैद्यकीय अधीक्षकांसह सर्व डॉक्टर व कर्मचारी संपावर...

दि . 25/03/2020

-मालेगाव शासकीय रुग्णालयात असलेल्या वैधकीय अधीक्षक व काही डॉक्टर यांना धक्काबुक्की..

-एमआयएम आमदार मुफ्ती इस्माईल यांच्यासह आलेल्या काही कार्यकर्त्यांनी केली धक्काबुक्की.

-न्यायालयाच्या आदेशाने उपचारासाठी दाखल झालेल्या आरोपीला उपचार देण्याच्या कारणावरून झालेत वाद.

-आरोग्य अधिकारी डॉक्टर किशोर डांगे याच्यासह इतर डॉक्टरांना शिविगाळ व धक्काबुक्की केल्याचा प्रकार..

-कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व वैधकीय डॉक्टर व कर्मचारी यांनी उगारले आंदोलनाचा पायंडा...

शहरातील महेशनगर येथील माजी नगरसेवक रिजवान खान यांच्या घरावर गोळीबार केल्या प्रकरणी अटक केलेल्या आरोपीस येथील न्यायालयाच्या आदेशाने सामान्य रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या आरोपीवर आपल्या रुग्णालयात सुरू असलेल्या उपचाराचा कालावधी का वाढविण्यात येत आहे. अशी विचारणा करीत सामान्य रुग्णालयातील वैद्यकीय अधीक्षक डॉ. किशोर डांगे यांच्यासह इतर डॉक्टर कर्मचाऱ्यांवर मालेगाव मध्य आमदार मौलाना मुफ्ती मोहम्मद यांच्या समर्थकांनी शिवीगाळ करीत मारहाण केली. या प्रकरणी आरोपींवर तत्काळ कारवाई करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी डॉक्टर व कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन केले.

 


ताज्या बातम्या