Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
गोळीबार करुन दहशत करणाऱ्या टोळीतील नऊ जण पोलीसांच्या ताब्यात

दि . 25/03/2020

 
 मालेगाव शहरात गोळीबार करुन दहशत करणाऱ्या टोळीतील नऊ जण पोलीसांच्या ताब्यात

मालेगाव (प्रतिनिधी) :- शहरातील मच्छिबाजार व मिल्लत मदरसा परीसरात गोळीबार करीत दहशत माज विनाऱ्या टोळक्यातील नऊ जणांना येथील शहर व पवारवाडी पोलीस ठाणे व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने संयुक्त कारवाई करून ताब्यात घेतले आहे.

शुक्रवार दि.२० रोजी शहरातील मच्छी बाजार व मिल्लत मदरसा परीसरात ३० ते ४० जणांच्या टोळक्याने हातात तलवारी, लाठ्या काठ्या घेऊन दहशत माजवित हवेत गोळीबार केला होता. यात मोहम्मद इसाक यास गोळी लागल्याने गंभीर जखमी झाला होता. या प्रकरणी शहर व पवारवाडी पोलीस ठाणे व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने संयुक्त कारवाई करून आरोपी सैय्यद अब्दुल वहाब जाकिर अली (२०) रा. अंजुमन चौक, मोहमद सुफियान रियाज अहमद (२२) रा. आयशनगर, शोएब अन्जुम मोहमद यासीन (२५) रा. फार्मसी नगर, अब्दुल मालिक शाहबुधीन (१८) रा. अख्तराबाद, अरशद खान अफजल खान (२०) रा. जाफर नगर, अन्सारी आतार हुसेन जाकीर हसेन (२२), शहीरयार आरिफ मुस्ताक अहमद (३०) रा. कमालपुरा, नदीम अहमद अब्दुल हमिद (२४) रा. आजमपुरा, तसेच मालेगाव शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हयातील नाफिज गुलाम अहमद मोहमद हबिब (२४) रा. जाफर नगर, मालेगाव यांचा शोध घेवून त्यांना ताब्यात घेतले. उर्वरित फरार आरोपी यांचा शोध घेतला जात आहे.


ताज्या बातम्या