Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
मालेगाव येथे संचारबंदी असतानाही नागरीक रस्त्यावर

दि . 25/03/2020

पूर्व भागातील नागरिकांना कृषी मंत्र्यांची विनंती

मालेगाव (प्रतिनिधी) :- कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनाने संपूर्ण राज्यात  संचारबंदी लागू केली आहे. मालेगाव शहरात मंगळवार दि. २४ रोजी या संचारबंदीचा परिणाम दिसून आला. शहरातील पश्चिम भागात अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवसाय बंद होते. रस्त्यावर तुरळक वाहतूक दिसून आली.

पोलिस प्रशासनाने सक्ती करीत यावर नियंत्रण मिळविले असले तरी याउलट शहरातील पूर्व भागात मात्र संचारबंदीची पायमल्ली होत असल्याचे दिसून आले. यावेळी चक्क कृषिमंत्री दादा भुसे यांना स्वतः पूर्व भागातील रस्त्यावर उतरून नागरिकांना घरी राहण्याची विनंती करावी लागली.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत नागरिकांनी जनता कर्फ्युमध्ये सहभाग घेत आपापले व्यवसाय बंद ठेवले होते. पश्चिम भागातील नागरिकांनी या आवाहनाला प्रतिसाद दिला असला तरी पूर्व भागातील नागरिकांनी मात्र या आवाहनाला ठेंगा दाखवत रस्त्यावर उतरले होते. हीच परिस्थिती संचारबंदी काळात देखील दिसून आल्याने शहरातील आरोग्य यामुळे धोक्यात येण्याची शक्यता मात्र नाकारता येत नाही. या भागात दुकाने बंद असली तरी लोक ठिकठिकाणी रस्त्यावर उतरले होते. यामुळे कृषी मंत्री दादा भुसे यांनी स्वतः पूर्व भागात जाऊन नागरिकांना आवाहन करीत घरीच राहण्याची विनंती केली. संचारबंदी असल्याने पोलिस प्रशासनाने शहरातील मध्यवर्ती ठिकाण असलेल्या मोसम पुलावर बेरिकेटिंग केले होते. मुख्य रस्त्यावर ठिकठिकाणी पोलीस तैनात होते.


ताज्या बातम्या