Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
मालेगाव येथे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याची अफवा

दि . 25/03/2020

मालेगाव (प्रतिनिधी) :- कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाकडून उपाययोजना होत असताना शहरात काल मंगळवार दि. २४  रोजी इंडियन मेडिकल असो. अध्यक्ष व द्वाराकमनी रुग्णालयाचे संचालक डॉ.मयूर शाह यांनी रुग्णालयात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याचे सांगितले असल्याची अफवा पसरविणारी पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. ही अफवा सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हायरल होताच डॉ.शहा यांनी थेट पोलिसांकडे तक्रार करीत सदर पोस्ट खोटी असल्याचे स्पष्ट केले. डॉ. शहा यांनी कॅम्प पोलीस उपअधीक्षक मंगेश चव्हाण यांच्याशी संपर्क साधून याबाबत सायबर विभागाकडे याची लेखी तक्रार केली आहे. अफवा पसरविणा-यांवर पोलिसांची नजर असून अशा व्यक्तींवर कारवाई केली जाणार असल्याचे चव्हाण यांनी सांगितले. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेऊ नये असे आवाहन पोलिसांनी केले आहे.


ताज्या बातम्या