Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
कत्तलीच्या हेतूने बांधून ठेवलेली ३ जनावरे व २०० किलो मांस जप्त...

दि . 24/03/2020

मालेगाव। शहरातील आझादनगर भागातील नांदेडी शाळेच्या बाजुला बंद लाकडी घरात अपर पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांच्या विशेष पोलीस पथकाने छापा टाकुन कत्तलीच्या इराद्याने बांधुन ठेवलेले तीन जनावरे रिक्षातुन वाहून नेण्यात येणारे 200 किलो मांस व रिक्षासह एकलाख 64 हजार किमतीचा ऐवज जप्त केला.पोलीसांनी फिरोज खान अल्ताफ खान (40), मोहम्मद आसिफ जमील अहमद मोमीन (42 दोघे रा. कमालपुरा) यांना अटक केली. जनावरांचा मालक जहीर खान फरार झाला.

 याच पथकाने सटाणा रस्त्यावरील मधुबनसमोर गिरणा नदीपात्रातुन बेकायदेशीर वाळु वाहतुक करणारे ट्रैक्टर व ट्रॉली एक ब्रास वालुसह तीन लाख 3 हजार रुपयांचा ऐवज जप्त केला. सतीष निकम (32 रा. दाभाडी) हा बिना परवाना का कायदेशीररित्या गिरणा नदीपात्रातुन अवैध गौण खनीज उपसा करतांना मिळुन आल्याबद्दल त्याच्याविरुष्द गुनहा दाखल करण्यात आला आहे.
तिया संशवितांविरुष्द गोवंश हत्याबंदी असतांना जनावरांची कतल व कतलीसाठी तीन जनावरे बाळगल्या बद्दल आझादनगर पोलीस ठाण्यात प्राणी संरक्षण कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


ताज्या बातम्या